मुंबई : ‘बालिका वधू’ फेम टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने आत्महत्या केली आहे. मुंबईच्या कांदिवतील राहत्या घरी गळफास घेऊन तिने आत्महत्या केली.आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. तिचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.कलर्स चॅनलवरील ‘बालिका वधू’ मालिकेतील आनंदीच्या भूमिकेमुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यानंतर ती ‘झलक दिखला जा’च्या पाचव्या आणि ‘बिग बॉस’च्या सातव्या सीझनची स्पर्धक होती. सध्या ती पॉवर कपल नावाच्या रिअॅलिटी शो करत होती.