नवी मुंबई: नवी मुंबई महापालिका आुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रशासकीय कामात अनियमितता ठेवणार्या महापालिका विभागप्रमुखांसह अधिकारी-कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचा महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा सिलसिला कायम आहे. 27 मे रोजीही आयुक्त मुंढे यांनी दोघा सहाय्यक आयुक्तांसह अधीक्षक आणि उपलेखापाल अशा चौघांवर महापालिकेच्या पैशाचा अपहार केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई केली. आयुक्तांच्या या कारवाईने नवी मुंबई पालिका मुख्यातील अधिकारी वर्गात खळबळ उडाली आहे.
महापालिकेच्या पैशांचा अपहार केल्याप्रकरणी अपहार केल्याप्रकरणी आयुक्त
तुकाराम मुंढे यांनी ऐरोली विभाग कार्यालयातील एका ठोक मानधनावरील कर्मचार्याला कामावरुन काढून टाकले. तर सहाय्यक आुक्त बाळकृष्ण पाटील, साहेबराव गायकवाड यांच्यासह अधीक्षक बाळकृष्ण पाटील आणि उपलेखापाल सुभाष सोनावणे अशा चौघांना निलंबित करण्यात आले आहे.एकंदरीतच महापालिका आयुक्त मुंढे यांनी महापालिकेच्या विविध विभागांचा आढावा घेतानाच संबंधित विभागप्रमुखांकडून कार्यअहवालही मागितला आहे.
यानंतर प्रशासकीय कामात अनियामितता असलेल्या विभागप्रमुख, अधिकार्यांवर त्यांनी थेट निलंबनाची कारवाई करण्यात सुरुवात केली आहे. यापूर्वी आयुक्त मुंढे यांनी मालमत्ता कर विभागाचे उपआयुक्त प्रकाश कुलकर्णी, दिघा विभाग कार्यालयातील उपस्वच्छतायनिरीक्षक आणि डेब्रीज विरोधी पथकातील अधीक्षक परशुराम जाधव यांना निलंबित केले आहे.