सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : युवा सेनेची संघटनात्मक बैठक रविवारी नेरूळ (प.) येथे उत्साहात पार पडली. या बैठकीस युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख विशाल विचारे, युवा सेनेचे नवी मुंबई निरीक्षक मयुर ब्रीड, शिवसेना विभागप्रमुख गणेश घाग आदी मान्यवर या बैठकीस उपस्थित होते.
युवा सेनेचे उपशहर अधिकारी निखिल रतन मांडवे यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस युवा सेनेचे उपशहर अधिकारी विवेक सुतार, विभाग अधिकारी रमेश शिवतरकर, विनायक (सनी) शिंदे, स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख राजेश पुजारी यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी, शाखा अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाची रूपरेषा, दहावी-बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरीता उपक्रम, महाविद्यालयीन प्रवेश यासह संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक (सनी) शिंदे यांनी केले. या कार्यक्रमात युवा सैनिकांच्या वतीने उपशहर अधिकारी निखिल मांडवे व विवेक सुतार यांचा सत्कार करण्यात आला.