आमदार नरेंद्र पवार यांच्या माध्यमातून ३८ प्रभागात तब्बल ११८ कार्यक्रमांचे आयोजन
कल्याण : उत्तम आरोग्याच्या दृष्टीने मानवी जीवनात योगा साधनेला फार महत्व आहे. योगाचे हेच महत्व जाणून मंगळवार २१ जून हा दुसरा जागतिक योग दिन म्हणून देश भरात साजरा करण्यात आला. याच जागतिक योग दिनाच्या निमित्ताने कल्याण पश्चिम विधानसभेचे आमदार तथा भाजपा प्रदेश सचिव नरेंद्र पवार यांच्या माध्यमातून विधानसभा क्षेत्रातील ३८ प्रभागात तब्बल ११८ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये कल्याण विभागातील नामांकित योगा संस्थांनी या उपक्रमात मोलाची भूमिका पार पाडली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेकडो नागरीकांनी दिवसभरात कल्याण शहरात ठिकठिकाणी योगाची प्रात्याक्षिके केली. विशेष म्हणजे आमदार नरेंद्र पवार यांनी देखील ठिकठिकाणी विद्यार्थी, नागरिक, सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी आदींबरोबर योगा करीत त्यांचा उत्साह वाढविला.
संयुक्त राष्ट्र संघटनेने मान्यतेची मोहर उमटवल्यावर २१ जून २०१५ हा जागतिक योगा दिन म्हणून घोषित करण्यात आला. याच दुसऱ्या जागतिक योगा दिना निमित्ताने कल्याण शहरात देखील आमदार नरेंद्र पवार यांच्या माध्यमातून महाविद्यालये, शाळा, महापालिका, गृहनिर्माण संस्था, संप्रदायीक संस्था आणि सामाजिक सेवाभावी संस्थाच्या मदतीने कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील ३८ प्रभागात ११८ कार्यक्रमाचे आयोजन करून योग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांना समाजातील प्रत्येक घटकांनी उस्फुर्त सहभाग घेतल्यामुळे योगा दिनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमामध्ये कल्याण शहरातील आर्ट ऑफ लिव्हिंग, पतांजली योग विद्यापीठ आदी नामांकित संस्थांनी उपस्थितांना योगाची प्रात्याक्षिके दाखवली. यामध्ये प्रामुख्याने प्राणायाम, कपालभाती, पदमासन, शिरशासान, सिद्धासन, नौकासन, हलासन, चक्रासन आणि सूर्य नमस्कार आदी योगा प्रकार करण्यात आले. त्याच प्रमाणे मानवी जीवनातील योगा साधनेचे महत्व उपस्थिताना सांगण्यात आले. या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहून आमदार पवार यांनी उपस्थितांना योगा दिनाच्या शुभेच्छा देऊन योगा करण्यात सहभाग घेतला. या दिनाच्या पहिल्या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ६.०० वाजता मोहन रेज्न्सी येथे आमदार नरेंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यानंतर कर्नाळा मंदिर गौरी पाडा, योगीधाम, राणी लक्ष्मीबाई, नूतन विद्यालय, सुनील क्रीडा मंडळ संतोषी माता रोड, गोदावारी अपार्मेंट आदी ठिकाणी संध्याकाळी ६.०० वाजे पर्यंत योगा दिनाचे कार्यक्रम पार पडले.
दरम्यान सदरचे तब्बल ११८ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव निखील चव्हाण, भाजपा शहर सरचिटणीस सदानंद कोकणे, भाजपा शहर सरचिटणीस अमित धाक्रस, भाजपा ज्येष्ठ नेते राजाभाऊ पातकर, भाजपा कार्यकर्ते अशोक शिंदे, रघुनाथ पाटील, राहुल भोईर, डॉक्टर अमित आणि डॉ ममता मिश्रा यांनी विशेष मेहनत घेतली. या योगा कार्यक्रमाला भाजपा नगरसेवक दया गायकवाड, अर्जुन भोईर, वरुण पाटील, सचिन खेमा, नगरसेविका वैशाली पाटील, उपेक्षा भोईर, कल्याण शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे आदी भाजपा नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. .