नवी मुंबई: खांदा कॉलनी भागात राहणार्या एका व्यक्तीने त्याच भागात राहणार्या एका साडेचार वर्षीय मुलासोबत आश्लल चाळे करुन त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
बाबुलाल चौधरी (३६) असे या व्यक्तीचे नाव असून खांदेश्वर पोलिसांनी त्याच्यावर लैंगिक छळ केल्याप्रकरणी तसेच पोस्को कायद्यानुसार गु्न्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
सदर प्रकरणातील आरोपी बाबुलाल आणि पिडीत मुलगा दोघेही खांदा कॉलनी भागात शेजारी रहाण्यास असून पिडीत मुलगा २९ जून रोजी रात्री आपल्या घराजवळ खेळत होता. यावेळी बाबुलाल याने त्याला टिव्ही दाखविण्याच्या बहाण्याने आपल्या घरामध्ये नेले. त्यानंतर त्याने त्याच्यासोबत अश्लिल चाळे करुन त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर पिडीत मुलाने घडल्या प्रकाराची माहिती आपल्या वडीलांना दिली. त्यानंतर त्यांनी खांदेश्वर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. सदर तक्रारीनुसार पोलिसांनी बाबुलाल विरोधात लैंगिक छळ तसेच पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.