नवी मुंबई : वृक्ष लागवडीसोबतच त्यांचे संगोपन गरजेचे असल्याचे मत आमदार मंदाताई म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे. राज्यशासनाच्या दोन कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित वृक्षरोपणाच्या कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी, शालेय विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढून वृक्ष संरक्षणासबंधी जनजागृतीही केली.
राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, विविध संस्था, मंडळे, शाळा, महाविद्यालये यांच्याकडून राज्यभर वृक्ष लागवडीचे आज नियोजन करण्यात आले होते. ह्या वनमहोत्सवाचे औचित्य आमदार म्हात्रे व शिरवणे विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ राजेश पाटील यांनी शिरवणे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज नेरूळ व शिरवणे येथे विद्यार्थ्यांसोबत सभोवताल परिसरात वृक्षारोपण केले. यावेळी, उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंदाताई म्हात्रे बोलल्या की, वृक्षाची लागवड करणे खूपच सोपे आहे परंतु, तदनंतर वर्षानुवर्षे त्याचे संगोपन करून सदर वृक्षास जिवंत ठेवणे खूपच जिकरीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.त्यामुळे, जीवित असणाऱ्या प्रत्येक वृक्षास टिकवणे ही नागरिकांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. तर डॉ राजेश पाटील यांनी सांगितले की, राज्यशासनाच्या ह्या दोन कोटी वृक्ष लागवड उपक्रमात सहभागी होणं ही काळाची गरज आहे पण वृक्ष लागवडी व वृक्षसंवर्धन केल्यास ऑक्सीजन हे मिळणार असल्याचे पाटील यांनी सांगितले या वेळी भाजपचे जेष्ठ नेते मारूती भोईर डॉ म्रूद््ल शेठ, भाजप नवी मुंबई उपाध्यक्ष डॉ विक्रमसिंह पराजुली प्रार्चाय सौ भाग्यश्री चौधरी, मुख्याध्यापक हरिराम भोईर व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी व पालक उपस्थित होते..