आमदार नरेंद्र पवारांच्या माध्यमातून हजारो वृक्षांचे रोपण
कल्याण : एकच लक्ष २ कोटी वृक्ष अशी साद महाराष्ट्राचे वन आणि अर्थमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी घातल्यानंतर पर्यावरणाच्या रक्षणासाठी हजारो कल्याणकरांनी शुक्रवारी वृक्षा रोपण केले. भाजपा प्रदेश सचिव आमदार नरेंद्र पवार आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सहकार्याने कल्याण पश्चिमेतील उंबर्डे परिसरात सुमारे १० हजार वृक्ष लावण्यात आली. यावेळी तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या हजारो श्री सदस्यांनी आमदार नरेंद्र पवार, महापौर राजेंद्र देवळेकर, उपमहापौर विक्रांत तरे, केडीएमसी आयुक्त ई. रविंद्रन, शिक्षण सभापती द्या गायकवाड, स्थानिक शिवसेना नगरसेवक जयवंत भोईर, नगरसेवक प्रभुनाथ भोईर आणि महापालिकेचे उद्यान निरीक्षक संजय जाधव यांच्या समवेत वृक्ष रोपण केले. श्री सदस्यांच्या विशेष उल्लेखनीय प्रतिसादामुळे येथे रोपे देखील कमी पडली.
ग्लोबलवॉर्मिंग आणि निसर्गाच्या अनियमितेमुळे राज्याला दुष्काळाचा मोठा सामना करावा लागला. यामुळे हि गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने वसुंधरा सप्ताहा निमित्त १ जुलै २०१६ हा दिवस महावृक्षारोपण दिन साजरा करण्याची घोषणा केली. यानुसार राज्याचे वन आणि अर्थमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी एकच लक्ष २ कोटी वृक्ष अशी घोषणा केली. यानुसार कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघात १ जुलै २०१६ या दिवशी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचे नियोजन पर्यावरण प्रेमी आमदार नरेंद्र पवार यांनी केले. यामध्ये कल्याण डोंबिवली महापालिका, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण जिल्हा कारागृह आधारवाडी तसेच अनेक शाळांनी या चळवळीत मोठे योगदान देत आपल्या स्थरावर वृक्षा रोपणाचे कार्यक्रम राबविले. यामध्ये प्रामुख्याने कल्याण पश्चिम विभागातील उंबर्डे गावात आमदार नरेंद्र पवार आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सहकार्यातून तब्बल १० हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. यामध्ये कल्याण शहरातील अनेक सेवाभावी संस्था, अनेक शैक्षणिक संस्थांनी उस्फुर्त सहभाग नोंदविला. त्याच प्रमाणे आमदार नरेंद्र पवार यांनी अनेक संस्थांच्या मदतीने कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती, श्री कॉम्पलेक्स, एवरेस्ट नगर, खडकपाडा, बल्याणी, मोहीली, योगीधाम, गंधारे नगर, डीबी चौक, नांद्प, टिटवाळा आदी विभागात हजारो वृक्षाचे रोपण केले.
दरम्यान याप्रसंगी भाजपा शहर अध्यक्ष प्रमनाथ म्हात्रे, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव निखील चव्हाण, शहर सरचिटणीस अमित धाक्रस, भाजपा महिला अध्यक्षा पुष्पा रत्नपारखी, भाजपा कल्याण शहर महिला सरचिटणीस हेमा पवार, भाजपा नगरसेवक अर्जुन भोईर, भाजपा नगरसेविका वैशाली पाटील, भाजपा नगरसेविका उपेक्षा भोईर, भाजपा ज्येष्ठ नेते राजाभाऊ पातकर, भाजपा ज्येष्ठ नेते देवानंद भोईर, आमदार मित्र राहुल त्रिवेदी आदी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने वृक्षारोपणासाठी उपस्थित होते.