- मुंबई : पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशी यात्रेसाठी एसटी महामंडळाने जय्यत तयारी केली आहे. यंदा ३,३५३ जादा बसेस सोडण्याचा निर्णय महामंडळाने घेतल्याची माहिती देण्यात आली. या बसेस ११ जुलैपासून सोडण्यात येतील.
११ ते १७ जुलै या कालखंडात संपन्न होणाऱ्या या यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून विभागनिहाय बस सोडण्यात येतील.
प्रवाशांच्या मार्गदर्शनासाठी आणि त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी विविध मार्गांवर २४ माहिती केंद्रे स्थापन करण्यात आली चंद्रभागा बस स्थानकातून मुंबई, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रासाठी बसेस सुटतील.
भीमा बस स्थानकातून मराठवाडा आणि विदर्भासाठी तर विठ्ठल सहकारी साखर कारखाना बस स्थानक खान्देश भागात जाणाऱ्या भाविकांसाठी निर्माण करण्यात आले आहे. याच साखर कारखाना बस स्थानकावर जाण्यासाठी पंढरपूर येथील अहिल्याबाई होळकर चौकातून एसटीची शटल सेवा
सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाने दिली.