कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ संतशिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराजांची (माऊलींची) पहाट-पूजा आज (शनिवार) सकाळी सात वाजता पालखीतळ सासवड येथे संपन्न झाली. आज दिवसभर पालखी सासवड मुक्कामी असून, उद्या (रविवार) सकाळी आठ वाजता पालखी जेजुरीकडे मार्गस्थ होईल.
|