नवी मुंबई : प्रभाग ९६ व ९७ मधील १० व १२वीच्या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शनिवार, दि. २ जुलै रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आयोजित करण्यात आला आहे.
नेरूळ सेक्टर १८ मधील पुणे विद्याभवन शाळेमध्ये सांयकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होणार असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुका अध्यक्ष गणेश भगत व नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.