सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र हागणदारी मुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्राप्त झालेल्या सुचनांनुसार कोपरखैरणे विभागामार्फत २९ जुलै रोजी कोपरखैरणे विभाग कार्यक्षेत्रातील अडवळी व भुतवळी येथे उघडयावर शौचास बसणार्या ६ व्यक्तींवर रु.७,२००/- इतकी दंडात्मक रक्कम वसुल करण्यात आली. सदर कारवाईस कोपरखैरणे विभागातील स्वच्छता अधिकारी प्रल्हाद खोसे, सुधीर पोटफोडे, दिनेश वाघुळदे, स्वच्छता निरीक्षक थोरात, नाईक, बेंडाळे, साळसकर व कर्मचारी उपस्थित होते.
तसेच २९ जुलै रोजी सकाळी ६.३० वाजता बेलापुर विभाग कार्यक्षेत्राअंतर्गत येणारे कार्यक्षेत्र दुर्गामाता नगर येथे झोपडपट्टी येथे उघडयावर शौचास बसणार्या २ व्यक्तींवर रु.२,४००/- इतकी दंडत्मक रक्कम वसुल करण्यात आली यावेळी बेलापूर विभागातील स्वच्छता निरीक्षक श्रीम. कविता खरात, उप स्वच्छता निरिक्षक रविंद्र चव्हाण, स्वच्छता निरिक्षक सत्यजीत देवधर व मिलिंद तांडेल, कर्मचारी व स्वच्छाग्रही उपस्थित होते.