मुंबई : गिरगावातील भटवाडी येथील पाठारे इमारतीचा काही भाग कोसळला. या इमारतीत अडकलेल्या तीन रहिवाशांची बचावपथकाच्या अधिका-यांनी सुखरूपरित्या सुटका केली असून असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
-
मिळालेल्या माहितीनुसार, गिरगावमधील जगन्नाथ शंकरशेठ मार्गावरील आर्यन शाळेजवळील गल्लीतील पाठारे हाऊल पाठारे हाऊस इमारतीच्या तिस-या मजल्याचा काही भाग शनिवारी सकाळी अचानक कोसळला व त्यामध्ये तीन रहिवासी अडकले.या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या व ३ अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्या. बचावपथकाच्या अधिका-यांनी शर्थीचे प्रयत्न करून अडकलेल्या तिघांनाही सुखरुपरित्या बाहेर काढले. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे इमारतीचा भाग कोसळल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.