त्यानुसार लिटील वर्ल्ड मॉल, हिरानंदानी खारघर परिसरातील पेट्रोलपंपाजवळ गुन्हे शाखेचे उपायुक्त दिलीप सावंत, सहाय्यक आयुक्त नितीन कौसडीकर, निरीक्षक नंदकुमार पिंजण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सुमेध खोपीकर, प्रतापराव कदम, उपनिरीक्षक सुनील सावंत, हवालदार प्रवीण बावा, विनायक निकम, जी. के. कांबळे, नाईक सूर्यभान जाधव, सुधीर चव्हाण व हवालदार विकास म्हसकर आदींच्या पथकांनी सापळा रचला.
यावेळी खारघर येथील लिटील वर्ल्ड मॉल, मागच्या बाजूला असलेल्या पेट्रोल पंपाजवळ संशास्पद वावरत असलेला प्रदीप धनाजी जाधव, राहणार वागळे इस्टेट ठाणे, अभय दत्तात्रय पाटील, राहणार वसई (पश्चिम), हेमंत सदाशिव पांचाळ राहणार खार- मुंबई, नोवेल इग्निशियश दिकोना, नालासोपारा (पश्चिम), पालघर हे इर्टीगा कार क्रमांक एमएच. ४८ एस ४८६९ या कारमधून आले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे असलेल्या एका बॅगेत १साप (मांडूळ) व इलेक्ट्रॉनिक वजन काटा असे साहित्य आढळून आले. हे साहित्य जप्त करून पोलिसांनी त्यांना अटक केली व त्यांची चौकशी केली.
चौकशीत लोकांना फसवण्याच्या उद्देशाने हे धंदे करीत असल्याची कबुली त्यांनी दिली. अटक केलेल्या चार जणांवर खारघर पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ४२०, ३४ सह वन्य जीव प्राणी १९७२ चे कलम ५१, ५२ अन्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास गुन्हे शाखा कक्ष-३ चे सहाय्क पोलीस निरिक्षक सुमेध खोपीकर हे पोलीस निरिक्षक नंदकुमार पिंजण यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.