ऐरोली विभाग कार्यक्षेत्रातील चिंचपाडा व यादवनगर
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र हागणदारी मुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्राप्त झालेल्या सुचनांनुसार ऐरोली विभागामार्फत 05/08/2016 रोजी सकाळी 5.00 ते 8.00 वाजता ऐरोली विभाग कार्यक्षेत्रातील चिंचपाडा व यादव नगर येथे उघडयावर शौचास बसणाऱ्या 9 व्यक्तींवर रु.7,650/- इतकी दंडत्मक रक्कम वसुल करण्यात आली तसेच नागरिकांना उघड्यावर शौचास न जाण्याबाबत प्रबोधन करण्यात आले. या वेळी ऐरोली विभागातील स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे,स्वच्छता निरिक्षक दिनेश वाघुलदे, स्वच्छता निरिक्षक सम्राट काबंळे, स्वच्छता उप निरिक्षक विशाल खारकर, दिपक शिंदे उपस्थित होते.