नवी मुंबई : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत सर्व निवासी वेलफेअर असोसिएशन (RWAs) व गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये कच-याच्या वर्गिकरणाबाबत विभाग स्तरावर विशेष मागदर्शन शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहे त्या अनुषंगाने 03/08/2016 रोजी संध्याकाळी8.30 वाजता बेलापुर विभागांतर्गत येणा-या बालाजी (हावरे) सोसायटी मध्ये रहिवाशांना ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण तसेच सोसायटीमध्ये कच-यांचे सेंद्रिय पध्दतीने कंपोस्ट खत तयार करण्याबाबत मार्गदर्शन देण्यात आले. यावेळी स्थानिक नगरसेविका ऍड . सौ. सपना गावडे – गायकवाड व बेलापूर विभागातील स्वच्छता निरीक्षक श्रीम. कविता खरात, उप स्वच्छता रविंद्र चव्हाण व मिलिंद तांडेल, कर्मचारी व स्वच्छाग्रही तसेच स्थानिक रहिवाशी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.