नवी मुंबईः नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा ६ ऑगस्ट रोजी ऐरोली सेक्टर-५ मध्ये आयोजित करण्यात आलेला ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रम काही अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात आला आहे.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे ६ ऑगस्ट रोजी महापालिका अधिकार्यांसह ऐरोली सेक्टर-५ मधील चिंचोली उद्यानात ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमांतर्गत सकाळी ६.३० वाजता उपस्थित राहून नागरिकांशी सुसंवाद साधणार होते. मात्र, काही अपरिहार्य कारणास्तव ६ ऑगस्ट रोजी ऐरोली सेक्टर-५ मध्ये होणारा महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रम काही अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात आला आहे, असे महापालिका जनसंपर्क विभागातर्फे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.