सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणूकीत बेलापुर विधानसभा मतदारसंघातील जायंट किलर ठरलेल्या भाजपा आमदार मंदाताई म्हात्रे यांनी निवडून आल्यापासून सातत्याने आरोग्य विषयक प्रश्नांना प्राधान्य देत नवी मुंबईकरांच्या स्वास्थाची आपणास काळजी असल्याचे कृतीतून दाखवून दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आपल्या आमदार निधीतून रूग्णवाहिका नवी मुंबईकरांच्या सेवेकरता कार्यरत केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्या रूग्णवाहिकेचे उद्घाटन करण्यात आले.
रूग्णालयातील असुविधा, रूग्णालयांचे लांबणीवर पडलेले उद्घाटन यासह अन्य समस्या निवारणासाठी त्यांनी पालिका आयुक्तांची भेट घेण्याकरता सातत्याने आपल्या चपला झिजविल्या आहेत. आमदार निधीचा अधिकाधिक भाग नवी मुंबईकरांच्या आरोग्य सुविधेकरता देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
नवी मुंबई हे शहर विकसित होत असताना नागरिकांच्या आरोग्याबाबत हि शासनाकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे. नवी मुंबई नागरिकांच्या आरोग्य सेवेत अधिक भर पडावी यासाठी बेलापूरच्या आमदार सौ मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीतून रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांच्या वर्षा निवासस्थानी पार पडला. नवी मुंबई मधील वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात ही रुग्णवाहिका कार्यरत राहणार आहे.
या उद्घाटन कार्यक्रमास भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व नगरसेवक रामचंद्र घरत, भाजयुमोचे नवी मुंबई अध्यक्ष दत्ता घंगाळे, नगरसेवक सुनिल पाटील, माजी स्थायी समिती सभापती संपत शेवाळे, मारूती भोईर, भगवानराव ढाकणे आदी उपस्थित होते.