नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र हागणदारी मुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्राप्त झालेल्या सुचनांनुसार 08/08/2016 रोजी सकाळी 5.00 ते 8.00 वाजेपर्यंत कोपरखैरणे विभागातील अडवली-भुतावली व खैरणे एमआयडीसी येथे उघडयावर शौचास जाणाऱ्या 4 व्यक्तींवर रु.4,800/- इतकी दंडत्मक रक्कम वसुल करण्यात आली तसेच सदर कारवाईच्या वेळी उपस्थित नागरिकांना उघड्यावर शौचास न जाण्याबाबत प्रबोधन करण्यात आले. तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या 5 नागरिकावर प्रत्येकी रु.250/- असे रु.1,250/- इतकी दंडात्मक कारवाई करण्यात आली तसेच रहिवाशांना ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण करण्याबाबत मार्गदर्शन देण्यात आले.
यावेळी कोपरखैरणे विभागातील स्वच्छता अधिकारी प्रल्हाद खोसे, सुधीर पोटफोडे, दिनेश वाघुळदे,स्वच्छता निरीक्षक थोरात, नाईक, बेंडाळे, साळसकर व स्वच्छाग्रही उपस्थित होते.