विद्या लोखंडे-गवई
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र हागणदारी मुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्राप्त झालेल्या सुचनांनुसार 10/08/2016 रोजी तुर्भे विभागातील तुर्भे स्टोअर, इंदिरा नगर व तुर्भे नाका येथे उघडयावर शौचास जाणाऱ्या नागरिकांमध्ये जनजागृती व प्रबोधन करण्यात आले. तसेच आय.सी.एल शिक्षण मंडळाच्या मोनामि शाळेतील विद्यार्थ्यांमार्फत झोपडपट्टी भागात जनजागृती रॅली काढण्यात आली व सर्व रहिवाशांना ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती व मार्गदर्शन करण्यात आले. या मोहिमेमध्ये आय.सी.एल शिक्षण मंडळाच्या मोनामि शाळेतील शिक्षक/ शिक्षिका तसेच तुर्भे विभागातील स्वच्छता अधिकारी के. के. मोरे, स्वच्छता निरीक्षक विजय पडघन, उप स्वच्छता निरीक्षक मनोज माहिते, किरण सोलस्कर, निवृत्ती म्हात्रे, स्वच्छाग्रही, परिसरातील नागरीक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.