विद्या लोखंडे-गवई
नवी मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी जलशुध्दीकरण केंद्र जांभूळ येथे तातडीच्या दुरुस्ती व देखभालीच्या कामाकरीता शुक्रवार 12 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 8.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत एकूण 12 तासांसाठी शटडाऊन घोषित केला आहे.
त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नेरुळ, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली व दिघा विभागातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून गावठाण व झोपडपट्टी भागामध्ये थेट जोडण्याव्दारे होणारा पाणी पुरवठा तसेच ऐरोली शहरी क्षेत्रामध्ये होणारा पाणीपुरवठा शटडाऊनच्या कालावधीत बंद राहील. त्यानंतर कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाईल, याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी.
तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी या कालावधीत पाण्याचा जपून वापर करुन नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.