* वाशी पोलिसांचा प्रबोधनात्मक उपक्रम
* लैगिंक अत्याचार व सुरक्षेबाबत माहिती
नवी मुंबई : महाविद्यालयीन तसेच शाळकरी विद्यार्थीनींमध्ये लैंगिक अत्याचार आणि सुरक्षेसंबंधी जनजागृती व्हावी या उद्देशाने वाशी पोलिसांनी आपल्या हद्दीतील सर्व शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थींनीसाठी प्रबोधनात्मक उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून १२ पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांचा विद्यार्थीनींशी सुसंवाद वाशी पोलिसांची विद्यार्थीनींमध्ये सुरक्षेसंबंधी जनजागृती ऑगस्ट रोजी वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये आजोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात ‘नवी मुंबई’चे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी विद्यार्थीनींना लैंगिक अत्याचार आणि सुरक्षेसंबंधी माहिती देऊन जनजागृती केली.
याप्रसंगी परिमंडळ-१चे पोलीस उपआयुक्त प्रशांत खैरे, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप माने, वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे, केबीपी कॉलेजचे प्राचार्य उपस्थित होते.
समाजात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनात वाढ होत असल्याने महाविद्यालयीन आणि शाळकरी मुलींमध्ये याबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच अशा लैंगिक अत्याचाराच्या घटना टाळण्यासाठी मुलींनी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करण्याच्या हेतुने वाशी पोलिसांनी आपल्या हद्दीतील सर्व शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थीनींसाठी जनजागृतीपर विशेष उपक्रम हाती घेतला आहे. वाशी पोलिसांनी या उपक्रमाच्या माध्यमातून आत्तापर्यंत चार शाळा-महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम घेण्यात आले आहेत.
१२ ऑगस्ट रोजी वाशीतील केबीपी कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात स्वत: पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सहभाग घेऊन महाविद्यालयीन तरुणींशी संवाद साधला. यावेळी पोलीस आयुक्तांनी मार्गदर्शन करताना, लैंगिक अत्याचाराच्या घटना घडण्यामागचे कारण स्पष्ट करतानाच अशा लैंगिक अत्याचाराच्या घटना टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी. आत्पकालीन वेळेस प्रसंगावधान दाखवून कशा प्रकारे स्वत:ची सुटका करुन घ्यावी. पोलिसांमार्फत सुरु करण्यात आलेल्या प्रतिसाद ऍपचा कसा वापर करावा, त्याद्वारे पोलिसांकडून कशा प्रकारे मदत मिळविता येईल या आणि अशा अनेक सुरक्षेसंबंधीची माहिती पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली.
यावेळी परिमंडळ-१चे पोलीस उपआयुक्त प्रशांत खैरे यांनी देखील बाल लैंगिक शोषण कायद्याची माहिती देतानाच मुलींनी कशा प्रकारे सुरक्षितता पाळावी याबाबत मार्गदर्शन केले. त्याच प्रमाणे सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी देखील विद्यार्थींनीना लैंगिक अत्याचाराच्या घटना टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी याबाबतचे मार्गदर्शन केले. केबीपी कॉलेज मधील सुमारे ३०० विद्यार्थीनींनी या मार्गदर्शनपर कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यावेळी अनेक विद्यार्थींनीनी पोलिसांशी संवाद साधून आपले मनोगत व्यक्त केले.