नवी मुंबई ः विद्यार्थी-विद्यार्थीनींची वाहतुक करणार्या स्कुल बस चालकांनी विद्यार्थी-विद्यार्थीनी, पालक, शिक्षक, स्कुल प्रशासन आणि वाहतुक पोलीस विभाग अधिकारी यांच्याशी समन्वय साधून सुरक्षित वाहतुक करावी, असे आवाहन ‘ठाणे जिल्हा राष्ट्रीय मजदूर कॉंग्रेस’चे अध्यक्ष (इंटक) तथा ‘परिवर्तन विद्यार्थी वाहतुकदार सेवाभावी संस्था’चे संस्थापक-अध्यक्ष मिथुन रमेश पाटील यांनी बेलापूर येथे केले.
महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतुक महासंघ आणि परिवर्तन विद्यार्थी वाहतुकदार सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्कुल बस, रिक्षा आणि स्कुल बस व्हॅन चालविणार्या चालक-मालक यांच्यासाठी बेलापूर येथे १३ ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या ‘विद्यार्थी सुरक्षित वाहतुक मार्गदर्शन शिबीर’मध्ये मिथुन रमेश पाटील बोलत होते.
स्कुल बस चालकांनी आपले वाहन नेहमी अपडेट ठेवावे, वाहतुकीचे नियम आणि संयम पाळावा आणि बालकांची सुरक्षितता या गोष्टीला प्रथम प्राधान्य द्यावे, असे आवाहन यावेळी मिथुन पाटील यांनी केले. नवी मुंबईतील स्कुल बस चालक-मालक संघटनांच्या पाठीमागे सदैव उभा राहीन, अशी ग्वाही यावेळी मिथुन पाटील यांनी दिली.
या एक दिवसीय शिबीरात ‘बेलापूर पोलीस स्टेशन’चे वाहतुक विभाग तज्ञ सुरेश थोरात यांनी सरकारचे वाहतुकीचे नियम, कायदे, अटी यांची माहिती वाहन चालकांना दिली. याशिवाय सुरक्षित वाहन चालविण्याची पध्दत सुरेश थोरात यांनी वाहनचालकांना सांगितली.
भारत देशात दरवर्षी ५ लाख रस्ते अपघात होतात. त्यात दिड लाख लोक मृत्युमुखी पडतात. स्कुल बस चालकांनी सुरक्षित वाहतुकीसाठी नियम, कायदा पाळावा -मिथुन पाटील तर दोन लाख लोक जखमी होतात. रस्ते अपघातांचे गांभिर्य लक्षात घेऊन वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम आणि कायदे काटेकोरपणे पाळले तर अपघाताचे प्रमाण अत्यल्प राहील, असे यावेळी सुरेश थोरात यांनी नमूद केले. रस्ते अपघात टाळण्यासाठी सुरक्षितपणे वाहने चालवा, असे आवाहन यावेळी सुरेश थोरात यांनी वाहनचालकांना केले.
या शिबिरात ‘महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतुक महासंघ’चे अध्यक्ष पांडुरंग हुमणे, उपाध्यक्ष शशिकांत देशमुख, पत्रकार राजेंद्र घोडके, ‘परिवर्तन विद्यार्थी वाहतुकदार सेवाभावी संस्था’चे संस्थापक-अध्यक्ष मिथुन पाटील, सल्लागार हरिष बेकावडे आदींनी मनोगते व्यक्त करून वाहन चालकांना मोलाचे मार्गदर्शन केले.
शिबीराच्या सुरुवातीस ‘परिवर्तन विद्यार्थी वाहतुकदार सेवाभावी संस्था’चे अध्यक्ष संतोष गोळे यांनी प्रास्ताविकात ‘संस्था’चे कार्य आणि सुरक्षित वाहतुक मार्गदर्शन शिबीराची थोडक्यात माहिती देऊन उपस्थित मान्यवरांचे यथोचित स्वागत करून सत्कार केला. यावेळी ‘महासंघ’चे पदाधिकारी देविदास भुजबळ, हरिष तावरे, राजेंद्र बोडके आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
शिबीर यशस्वी करण्यासाठी ‘परिवर्तन विद्यार्थी वाहतुकदार सेवाभावी संस्था’चे पदाधिकारी हेमेंद्र परब, गंगाराम हाटे, पांडुरंग शिंदे, जितेंद्र बहाडकर, रामचंद्र पवार, संतोष चव्हाण, कुल प्रकाश जयस्वाल आदींनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन दत्ता
मुकादम यांनी केले.