नवी मुंबई : वाशी विभागातील विविध समस्या जाणून घेऊन तोडगा काढण्यासाठी बेलापूर मतदारसंघाच्या भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी वाशी सेक्टर-९ येथे दौरा केला. तेथील शेकडो फेरीवाल्यांच्या अनेक समस्या, अपंग सेवा संस्थेच्या सदस्यांचे समस्या यांसारखे अनेक प्रश्न येत्या काही दिवसांत सोडविण्याचे आश्वासन आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दिले.
यावेळी त्यांच्यासमवेत वाशीतील शिवसेनेचे नगरसेवक किशोर पाटकर, नवी मुंबई भाजपा सचिव प्रमिला खडसे, नवी मुंबई भाजपा सेल अध्यक्ष विक्रम पराजूली, लेवी सिंग, कर्तव्य मोदी, शितल भोईर , वाशी विभाग अधिकारी महेंद्र ठोके यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.