नवी मुंबई : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाबाबत प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेचे उप आयुक्त श्रीम.रिता मेत्रेवार (स्व.म.अ.), उप आयुक्त (घ.क.व्.) श्री. तुषार पवार व उप आयुक्त (परिमंडळ-1) दादासाहेब चाबुकस्वार यांच्या मार्गदर्शनाखाली एस.आय.ई.एस(S.I.E.S.) महाविद्यालयाच्या एनएसएस (NSS) युनिट मधील विद्यार्थ्यांनी नेरुळ विभागातील शिरवणे गाव व परिसरातील प्रत्येक घरोघरी जाऊन ओला कचरा-सुका कचरा वर्गिकरण तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे बाबत मार्गदर्शन केले. यावेळी परिसरात स्वच्छतेबाबत जनजागृती करून स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. सदर विशेष स्वच्छता मोहिमेमध्ये विभाग अधिकारी, नेरूळ उत्तम खरात, उप स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनवणे,स्वच्छता निरीक्षक यश पाटील, अरूण पाटील, जयेश पाटील, उप स्वच्छता निरीक्षक योगेश पाटील, स्वच्छाग्रही व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
तुर्भे विभागातील गणपतीपाडा व बोनसरी गांव येथील वैयक्तिक घरगुती शौचालय (IHHL) बांधण्यास तयार नसलेल्या नागरिकांची तुर्भे येथील गणपती मंदिरात सभा आयोजित करण्यात आली होती. सदर सभेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे उप आयुक्त (परि.-1) दादासाहेब चाबुकस्वार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच नागरिकांना शौचालयाचा वापर करण्याचे महत्व व फायदे पटवुन दिले. यावेळी वैयक्तिक घरगुती शौचालय बांधण्याकरीता नागरिकांना प्रवृत्त केले. यावेळी उप आयुक्त (परि.-1) दादासाहेब चाबुकस्वार, सहा. आयुक्त श्रीम. अंगाई साळुंखे, उप अभियंता दिपक सुर्यराव, स्वच्छता निरीक्षक दिनेश पाटील, वरिष्ठ लिपिक संदिप नाईक, शौचालय बांधणी तंत्रज्ञ निकम व स्वच्छाग्रही तसेच स्थानिक नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.