श्रमिक सेना युनियनचा यशस्वी करार
नवी मुंबई : पावणे येथील मे. सविता ऑईल टेक्नॉलॉजी या कंपनीतील कामगारांसाठी माजी मंत्री गणेश नाईक संस्थापित श्रमिक सेना युनियनने भरघोस पगारवाढीचा करार केला असून ७२०० रुपयांची घसघशीत वेतनवाढ कामगारांना मिळाली आहे. कंपनीचे मालक गौतम मेहरा आणि संस्थापक-अध्यक्ष गणेश नाईक यांच्या सहकार्याने कामगारांसाठी आतापर्यत ११ यशस्वी करार करण्यात आले आहेत.
गणेश नाईक यांच्या उपस्थितीत २७ ऑगस्ट रोजी कंपनीच्यावतीने व्हाईस प्रेसीडंट एस. जी. खोबरेकर व जनरल मॅनेजर श्री. परब यांनी तर श्रमिक सेना युनियनच्या वतीने अध्यक्ष डॉ. संजीव गणेश नाईक, सरचिटणीस चरण जाधव, कामगार प्रतिनिधी नामदेव ठाकूर, दीनानाथ भोईर, गोरख पाटील, रमेश म्हात्रे, हनुमान म्हात्रे यांनी सह्या केल्या.
हा करार एप्रिल २०१५ ते मार्च २०१८ या कालावधीसाठी आहे. त्यानुसार ७२०० रुपये पगारात वाढ होणार आहे. ७२०० पगारवाढीच्या व्यतिरिक्त महागाई भत्ता मिळणार आहे. सदरची पगारवाढ ही कामगारांच्या मूळ पगारात ६०% आणि ४०% इतर भत्त्यांमध्ये देण्यात येणार आहेत. पगारवाढी व्यतिरिक्त कामगारांना २०,३५० रुपये बोनस, सेवा निवृत्ती सानुग्रह अनुदान म्हणून ७५,०००रुपये दिवाळी बक्षीस म्हणून १,५०० रुपये मिळणार आहे. एका वर्षामध्ये १० कामगारांना बिनव्याजी ६,००,००० लाख रुपये कर्जाची सविधा, वैद्यकीय सुविधेमध्ये कामगार सेवेत असताना पती-पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी एक वेळ ५०,००० रुपये, दोन वेळा ३५,०००, एकवेळ मुलासाठी २५,०००रुपये अशा वैशिष्टयपूर्ण सुविधा या कराराच्या माध्यमातून मिळणार आहेत. या करारान्वये कामगारांना अप्रत्यक्षपणे जवळजवळ ११,५०० रुपये ते .१२,०००रुपये पगारवाढ प्राप्त होणार आहे. कामगारांना थकबाकीपोटी १,००,००० रूपये रक्कमही मिळणार आहे. ही रक्कम गौरी-गणपती सणापूर्वी मिळणार असल्यामुळे कामगारांना श्री गणेश प्रसन्न झाला आहे.
3 Attachments
Click here to Reply, Reply to all, or Forward
|