त्याचा पत्नीशी नेहमीच वाद होत असल्याचे समजते. त्यामुळे तो कधी मुंब्रा येथे आईकडे तर कधी भिवंडीत पत्नीकडे राहत होता. काही दिवसांपुर्वीच तो पत्नी आफरीन हिच्याकडे राहण्यास आला होता. क्षुल्लक वादातून त्याने राहत्या घराच्या छताच्या लोखंडी एंगलला ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली. या आत्महत्येची नोंद निजामपूर पोलीस ठाण्यात केली आहे. पुढील तपास पोउनि. मारुती कारवार करीत आहे.