श्रीकांत पिंगळे
नवी मुंबई : सिडकोचे माजी संचालक, नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते व शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक तसेच पालिका सभागृहातील शिवसेनेचे अभ्यासू नेतृत्व असणार्या नामदेव भगत यांची शिवसेनेने गोवा राज्य सहसंपर्कपदी नियुक्ती केली. गोव्यातील निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर नामदेव भगत यांच्यावर महत्वपूर्ण जबाबदारी टाकत शिवसेना संघटनेने त्यांच्या नेतृत्व क्षमतेवर व संघटनाबांधणीवर विश्वास दाखविला आहे. त्याबाबत कृतज्ञता व्यक्त करत नामदेव भगत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.