श्रीकांत पिंगळे
नवी मुंबई : युवा सेनेची नवी मुंबई कार्यकारिणी जाहिर झाल्यापासून विधानसभा अधिकारी मयुर ब्रीद यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेच्या पदाधिकार्यांनी व युवा सैनिकांनी जोरदार संघटना बांधणीचा शुभारंभ केला आहे. प्रभागा प्रभागात युवकांशी तसेच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी चर्चा अभियान सुरू केले आहे. विद्यार्थी दशेतच युवा सेनेच्या माध्यमातून शिवसेनेकडे जनाधार वळविण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून विधानसभा अधिकारी मयुर ब्रीद यांच्या नेतृत्वाखाली नेरूळ सेक्टर 15 येथील शिवसेना शाखेत बेलापुर उप विधानसभा अधिकारी निखिल मांडवे आणि समन्वयक नेहा राणे यांनी सिवूड्स येथील टिळक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी चर्चा केली. यावेळी युवा सेनेचे शाखा अधिकारी ओमकार मासाळ, अजय तळेकर, उप शाखा अधिकारी विनायक धनावडे, साईश जाधव व युवा सैनिक उपस्थित होते.