नवी मुंबई :- गृहनिर्माण सोसायटी स्थापन करून स्वस्तात घरे देण्याचे आमिष दाखवत शासनाची व माथाडी कामगारांची फसवणूक करणाऱ्या संघटनावर कारवाई करावी अशी मागणी माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार संघर्ष समितीने पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे शुक्रवारी केली आहे.यात करोडोंचा घोटाळा झाला असून त्याचीही चौकशी करण्याची मागणी समितीने केली आहे.
राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन कर्मचारी दिलीप यादव यांच्यावर एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या व्यतिरिक्त खरे गुन्हेगार अजून मोकाट असल्याचे समितीचे अध्यक्ष तानाजी जाधव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.घर वाटपात करोडो रुपयांचा घोटाळा झाला असून माथाडी संघटनाच्या दहशतीतीखाली कोणीही समोर येत नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.ज्यांनी माथाडी कामगारांकडून करोडो रुपये गोळा केले आहेत,त्यांनी घेतलेल्या पैशाचे काय केले,ते कोण आहेत यांची सखोल चोकशी करण्यात यावी,तर युनियनच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त,कर्मचारी यांची चौकशी करून त्यांच्या मालमत्तेचीही चौकशी करावी त्यावेळी मोठा घोटाळा समोर येईल असे या पत्रात जाधव यांनी सांगितले आहे.काही संघटनांनी सुरवातीला माथाडी कामगारांच्या घरे बुकिंगसाठी सुरवातीला ५,०००/- रुपये घेतले त्यांना आजपर्यंत घरे मिळाली नाहीत,सन २००७ साली ७०० घरांसाठी १० हजार रुपये प्रमाणे हजारो कामगारांकडून पैसे गोळा करण्यात आले.त्याव्यतिरीक्त युनियन निधी म्हणून लाखो रुपये प्रत्येक घरासाठी कामगारांकडून घेण्यात आले.दोन वर्षात घरे देतो सांगून सात वर्ष लावली त्यामुळे घरांच्या किमतीती वाढ झाली.सन २०१२/१३ साली १६ हजार कामगारांकडून घरे देण्याचे आमिष दाखवून तब्बल ८ कोटी रुपये जमा करण्यात आले.ते पैसे कुठे गेले याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.युनियन कामगार माथाडी कामगार नसतानाही त्यांना कामगार दाखऊन बोर्डामध्ये बेकायदेशीरपणे नोंद करून घरे देण्यात आली आहे याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आलि आहे.अश्या महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन ,अखिल महाराष्ट्र माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन व अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन सह इतर युनियनने माथाडी आणि जनरल कामगारांची फसवणूक केली आहे.या सर्व युनियनची खातेनिहाय चौकशी करावी अशी मागणी जाधव यांनी समिती च्या माध्यमातून पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे केली आहे.
साभार : दै. जनशक्ति