नवी मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजुने सरकार आहे, त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देणारंच असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मराठा क्रांती मोर्चा आयोजकांनी चर्चेसाठी यावे असंही ते म्हणाले. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट मध्ये माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमीत्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
आरक्षणाच्या निर्णयासाठी आम्हाला चर्चा करायची आहे. कारण थेट निर्णय जाहीर करता येत नाही. त्यामुळे आपल्याला एकत्र येऊन चर्चा करावी लागेल, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करणार असल्याचं अश्वासन दिलं.मराठा समाजाच्या 5 लाख तरुणांना कौशल्य विकासाचं शिक्षण दिलं जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. तसेच माथाडी कामगारांसाठी राज्यभर घरकुल योजना राबविणार असून माथाडी कामगारांचे सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.