नऊ महिन्यात मुंबईत २९६ जणांना डेंग्यूची
तर ३० जणांना लेप्टोची लागण
ताप ९ हजार ७१७ तर मलेरिया ७१७ रूग्ण
मुंबई : शहरात डेंग्यू आणि लेप्टोच्या आजाराने डोकेवर काढले असतानाच गेल्या नऊ महिन्यात २९६ जणांना डेंग्यूची तर ३० जणांना लेप्टोची लागण झाली आहे. तर तापाचे ९ हजार ७९६ तर मलेरियाचे ७१७ रूग्ण आढळून आले आहेत. गेल्या २५ दिवसात डेंग्यू संशयित आणि डेंग्यू सदृश्य तापाचे तब्बल ३ हजार २८७ रूग्ण आढळले आहेत
गेल्या वर्षी डेंग्यूचे २४८ तर लेप्टोचे २६ रूग्ण हेाते. तापाचे १२ हजार १७०, मलेरिया १०३८ रूग्ण होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत डेंग्यू आणि लेप्टोचे रूग्ण वाढले आहेत. तर ताप आणि मलेरियाच्या रूग्ण कमी झाले आहेत. यंदाच्या वर्षी हेपॅटायटीसचे १०८ रूग्ण गॅस्ट्रोचे ५२३ रूग्ण आढळून आले आहेत. गेल्या वर्षी अनुक्रमे ८६ व ७६९ रूग्ण होते. यंदाच्या वर्षी ७६ टक्के पुरूष रूग्ण तर २४ टक्के महिला रूग्ण आहेत. तसेच २२६ जणांना विविध आजार झाले असून हे १५ ते ४५ वयोगटातील रूग्ण आहेत. तर १७.६ टक्के रूग्ण हे १५ वर्षापेक्षा लहान वयोगटातील आहेत.
डेंग्यू लेप्टोने घेतला दोघांचा बळी
पालिकेच्या एस विभागातील २७ वर्षीय महिलेचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे तिला १३ सप्टेंबर रोजी डेंग्यूचे निदान झाल्यानंतर तिच्यावर उपचार सुरू होते २१ सप्टेंबरला तिचा मृत्यू झाला. तर पालिकेच्या एम पूर्व विभागातील १८ वर्षाच्या युवकाचा लेप्टोच्या आजाराने मृत्यू झाला आहे. १७ सप्टेंबरला लेप्टोची लागण झाली हेाती. रूग्णालयात उपचार सुरू असतानाच २१ सप्टेंबरला त्याचा मृत्यू झाला.
—————
डेंग्यूच्या रूग्णांची आकडेवारी (१ ते २५ सप्टेंबरपर्यंत )
वयोगट पुरूष स्त्री
० ते १४ ३५ १७
१५ ते २९ १५५ ३८
३० ते ४० २८ १५
४५ ते ५९ ०६ ०
६० ते त्यावरील ०१ ०१