मुंबई : मुख्यमंत्री अडचणीत आणण्यासाठी भाजपचे मराठा नेते मोर्चाच्या आयोजनात मदत करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मालिक यांनी केला आहे. राज्यात सर्वत्र लाखोच्या संख्येने मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचंड दबावाखाली असून त्यांच्या बदलाचे वारे ही सोशल मिडियात वाहत आहेत, याला मुख्यमंत्र्यांचे स्वकीय जबाबदार असल्याचे ही मालिक यांनी म्हटले आहे. मराठा समाजाला आरक्षण देणार ते कसे अणि कधी देणार याचा खुलासा ही मुख्यमंत्र्यांनी करावा अशी मागणी ही त्यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या विरोधात कुणी राजकीय वातावरण तापवले आहे, याचा शोध मुख्यमंत्र्यांनी घ्यावा. तसेच अनेक मराठा समाजाचे भाजप मधील नेते मुख्यमंत्री अडचणीत येतील अशी वक्तयवे करत आहेत. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर ही अधिवेशन काळात असे वक्तव्य करण्यात आले होते. तसेच अनेक मंत्री मुख्यमंत्र्यांच्या कार्य पद्धतीवर नाराज असल्याचे कळते आहे. मात्र त्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांच्या विरोधात थेट बोलता येत नसल्याने सोशल मिडियाचा आधार घेऊन त्यांच्या विरोधात वातावरण तापवले जात असल्याचे मालिक यांनी म्हटले आहे. राज्यात पुढच्या वर्षी अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होत आहेत. मात्र अद्याप ही महामंडळाच्या नेमणुका झाल्या नाहीत, याची ही खदखद या नेत्यांना मनात आहे.
राज्यतल्या अनेक मोर्चात भाजप नेते सामील होत आहेत. मराठा आरक्षण सध्या न्यायालयीन प्रक्रियेत आहे.अजुन त्याचा ठोस निर्णय झाला नसल्याने भाजप – सेना सरकारच्या विरोधात हे मोर्चे निघत आहेत. या मोर्च्यात सामील होणाऱ्या या नेत्यांची नेमकी भूमिका काय आहे? याचा खुलासा ही मुख्यमंत्र्यांनी जनतेपुढे करावा असे आवाहन ही मालिक यांनी केले आहे.
या मोर्चातील मागण्यांचा राज्यातील दलित आणि इतर मागासवर्गीय समाजाने ही धसका घेतला असून हे प्रकरण मुख्यमंत्र्यांना चांगलेच अडचणीत आणणारे ठरणार याची पूर्ण जाणीव भाजप मधल्या मराठा नेत्यांना असून मराठा मोर्चा अधिक परिणाम कारक करावा यासाठी पक्षातील मुख्यमंत्री विरोधी शक्ति कामाला लागली असल्याचे ही मालिक यांनी सांगितले