श्रीकांत पिंगळे
नवी मुंबई : डेंग्यू, मलेरिया आदी साथीच्या आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नेरूळमधील पालिका प्रभाग ८७ मधील सेक्टर ८ व १० परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांतील घराघरामध्ये पालिका कर्मचार्यांकडून घराघरामध्ये पावडर फवारणी करण्यात आली. या पावडर फवारणीकरता शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. विशेष म्हणजे हे पावडर फवारणी अभियान राबविले जात असताना पालिकेच्या कर्मचार्यांसोबत नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे याही घराघरामध्ये उपस्थित होत्या.
शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस हे पावडर फवारणी अभियान राबविण्यात आले असून आता प्रभागातील उर्वरित गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पुढच्या शुक्रवारी अभियान राबविले जाणार आहे. साथीच्या आजार उद्रेकामुळे अन्य नगरसेवकांकडूनही अभियानाची पालिका प्रशासनाकडे मागणी होत असल्यामुळे उर्वरित सोसायट्यांमध्ये आगामी आठवड्यामध्ये पावडर फवारणी केली जाणार असल्याची माहिती नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी दिली.
शुक्रवारी शिवनेरी, वृंदावन, इंद्रप्रस्थ, नंदनवन, साईकृप्पा, सनशाईन, शिवतिर्थ या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये तर शनिवारी पंवचटी, त्रिमूर्ती, श्रम साफल्य, उन्नती, तृप्ती, संजीवनी या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पावडर फवारणी करण्यात आली.
यावेळी नगरसेविका मांडवे यांच्यासमवेत शिवसेनेचे माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवे, युवा सेनेचे बेलापुर उप विधानसभा अधिकारी निखिल मांडवे, गृहनिर्माण सोसायट्यांचे पदाधिकारी, स्थानिक रहीवाशी व शिवसैनिक उपस्थित होते.