१ दिवसात ९०० मेट्रिक टन कचरा जमा
नवी मुंबईः नवी मुंबई शहरातील कचरा गोळा करण्यासाठी असलेली पद्धत चुकीचे असल्याचे निदर्शनास आल्यावर नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विशेष ‘कचरा जमा’ मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून २ ऑक्टोबर रोजी स्वछता अभियानाचा वर्धापन साजरा केला जात असताना नवी मुंबई शहराच्या कानाकोपर्यात दरदिवशी गोळा होणार्या कचर्यापेक्षा अधिक कचरा गोळा झाल्याने नवी मुंबई शहरातील स्वछतेचे प्रमाण अद्यापि ‘जैसे थे’च असल्याचे निदर्शनास आले आले आहे. दरदिवशी ६७० मेट्रिक टन इतका कचरा नवी मुंबई शहरातून गोळा केला जातो. मात्र विशेष मोहिमेत कचरा जमा होणयचे प्रमाण दुप्पट असल्याचे आढळून आल्याने नवी मुंबई शहरात स्वछता मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार आहे.
नवी मुंबई शहरातील विविध भागात २ ऑक्टोबर रोजी स्वछता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. कोपरखैरणे विभाग अधिकारी अशोक मढवी, उप स्वछता अधिकारी हरिभाऊ खोसे या अधिकार्यांनी कोपरखैरणेतील रेल्वेस्थानक, झोपडपट्टी,बस डेपो आणि इतर भागात स्वछता मोहिम हाती घेतली होती. यावेळी दैनंदिन सफाई पेक्षा अधिक कचरा साफ करावा लागला. शाळकरी मुलांना घेऊन अखेर जनजागृती मोहीम राबवून कचरा सफाईबाबत माहिती देण्यात अली. दरदिवशी कोपरखैरणे परिसरात १२० मेट्रिक टन कचरा गोळा केला जातो. मात्र विशेष मोहिमेत कचरा गोळा होण्याचे प्रमाण अवघ्या तीनतासात १३१ मेट्रिक टन इतके आढळून आल्याने स्वच्छता मोहीम सुरूच ठेवण्याचा निर्धार करून कोपरखैरणे परिसर कचरा मुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा आणि नैसर्गिक विधी करणार्या नागरिकांकडून दंड वसुली मोहीममहापालिकेद्वारे दरदिवशी राबविली जात आहे.
आरोग्याचा गंभीर प्रश्न उध्दभवल्याने स्वच्छता मोहीम सुरु ठेवली जाणार आहे. तुर्भे परिसरामध्ये,एपीएमसी मध्ये देखील १५० टनापेक्षा अधिक कचरा दरदिवशी गोळा केला जातो. विशेष स्वच्छता मोहिमेमध्ये रविवार असल्याने रोजपेक्षा अधिक अर्थात २०० टन कचरा गोळा करण्यात आला. दिघा,नेरुळ,बेलापूर,वाशी या सर्वच ठिकाणी नियमित कचरा गोळा केला जातो. त्यापेक्षा अधिक कचरा गोळा करून नवी मुंबई शहराची स्वछता करून झाल्यावर नवी मुंबई शहर कचरा मुक्त करण्याचे निर्देश घनकचरा व्यवस्थापन विभागाला महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत.