नवी मुंबई : मे.टेक्नोक्राप्ट इंडस्ट्रीज लि. (टय्ाुब डिव्हीजन), मुरबाड या कंपनीत गेल्या १५ वर्षांपासून लोकनेते गणेश नाईक यांनी स्थापन केलेल्या श्रमिक सेना य्ाुनियन कामगारांचे प्रतिनिधीत्व करत आहे. सदर कंपनीत श्रमिक सेना य्ाुनियन ही मान्यता प्राप्त य्ाुनियन आहे. सध्या कंपनीत श्रमिक सेनेचे ६० सभासद काम करीत आहेत.श्रमिक सेना युनियनच्यावतीने एप्रिल २०१६ मध्ये कंपनीकडे कामगारांच्या पगारवाढीचे मागणीपत्रक सादर करण्यात आले होते. मागणीपत्रक सादर केल्यानंतर युनियनच्यावतीने अध्यक्ष डॉ.संजीव गणेश नाईक, युनियनचे सरचिटणीस चरण जाधव यांनी वेळोवेळी व्यवस्थापनाशी जवळजवळ ४ ते ६ बैठका घेऊन अखेर ६ हजार ६०० इतका भरघोस पगारवाढ आणि २ हजार रुपये महागाई भत्ता देणारा करार घडवून आणला.
सदर करार हा एप्रिल २०१६ ते मार्च २०२० या कालावधीसाठी असून करारान्वये कामगारांंना एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ मध्ये रुपये १ हजार ६५० व बदलणारा महागाई भत्ता, एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ मध्ये रुपये १ हजार ६५० व बदलणारा महागाई भत्ता, एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ मध्ये रुपये १ हजार ६५० व बदलणारा महागाई भत्ता, एप्रिल २०१९ ते मार्च २०२० मध्ये रुपये १ हजार ६५० व बदलणारा महागाई भत्ता असे एकूण पुढील चार वर्षाकरीता ६ हजार ६०० वाढवून मिळणार आहेत तसेच महागाई भत्याची रक्कम विचारात घेता रुपये २ हजार व कामगारास आणि कामगारांच्या कुटुंबास वैद्यकीय मदत म्हणुन कर्मचारी राज्य विमा योजना अंतर्गत प्रथमच सुविधा देण्यात येणार आहे. आणि जे कामगार सदर सुविधेला पात्र नाहीत त्या कामगारांना वर्षाला ७५ हजार ००० रुपयांची मेडिक्लेम सुविधा मिळणार आहे. त्याचा दरमहा हप्ता ५०० रुपये कंपनी भरणार आहे. तसेच कामगारांना एक सणाची (रक्षाबंधन) सुट्टी वाढवुन देण्यात आली आहे. वरील सर्व रक्कमेचा विचार केला तर पगारवाढ १ हजार ६५० अधिक महागाई भत्ता ५०० रुपये अधिक मेडिक्लेम पॉलिसीचे ५०० रुपये व एक सुट्टी ४०० रुपये असे एकुण दर वर्षाला ३ हजार ०५० रुपये व चार वर्षाकरीता एकुण १२ हजार २०० रुपये त्यांच्या सरळ पगारात वाढ होणार आहे.सदरचा करार हा मुरबाड एम.आय.डी.सी. मध्ये सर्वात मोठा करार करण्यात श्रमिक सेना युनियनला यश आले आहे.काही दिवसांपुर्वी सविता पॉलिमर, महाड येथे रुपये ९ हजार ००० रुपयांचा करार व वाडा येथील मे.कॅपॅसिटी स्ट्रक्चर याकंपनीत ४४ कामगारांना कायम करुण रुपये १० हजार ००० हजार पगारवाढ देण्यात आली असतानाच श्रमिक सेना युनियने मुरबाड एमआयडीसीमध्ये हा एक भरघोस पगार वाढिचा ऐतिहासिक करार करुन श्रमिक सेना युनियनची ताकत वाढविली आहे.त्यामुळे मुरबाड एमआयडीसीमध्ये श्रमिक सेना युनियनचा जयघोष होत आहे.
कंपनीतील सर्व कामगारांना कराराची थकबाकी एप्रिल २०१६ ते ऑक्टोबर २०१६ या कालावधीसाठी सरासरी १० हजार ००० रुपये मिळणार आहे.तसेच कामगारांनी कंपनी व्यवस्थापनास उत्पादन वाढीची व गैरहजेरी बद्दल हमी दिली आहे.करारावर कंपनीच्यावतीने कंपनीच्यावतीने कंपनीचे डायरेक्टर अंतु चौधरी, जी.एम.एच.आर.हेमंत चौधरी, युनियनच्यावतीने युनियनचे अध्यक्ष डॉ.संजीव गणेश नाईक, सरचिटणीस चरण जाधव यांनी व कामगार प्रतिनिधी हनुमान भोईर, जोगिंदर शर्मा, साक्षीदार म्हणून सुनिल शेट्टे, तुषार कदवाडकर यांनी सहया केल्या.सदरच्या भरघोस पगारवाढीच्या करारामुळे कंपनीतील कामगार श्रमिक सेना युननियन आणि कंपनीचे मालक एस.एम.सराफ यांना धन्यवाद देत आहेत.