नवी मुंबई ः संपूर्ण महाराष्ट्राला याड लावणार्या ‘सैराट’ या मराठी चित्रपटातील सुप्रसिद्ध कलाकार पहिल्यांदाच नवी मुंबईत येणार आहेत. सीवुडस्, सेक्टर-२५ मधील खिलारी आय केअरच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ‘सैराट’ चित्रपटातील सुप्रसिद्ध कलाकार येत्या ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता नवी मुंबईत येत आहेत. त्यामुळे नवी मुंबईकरांना ‘सैराट’च्या कलावंताना याची देही याची डोळा पाहण्याची संधी मिळणार आहे.
चष्मा आणि गॉगलसाठी प्रसिद्ध असलेल्या खिलारी आय केअरने सीवुडस्, सेक्टर-२५ मधील मिलेनियम पार्क इमारतीत आपले पाचवे दुकान सुरु केले आहे. या दुकानाच्या उद्घाटनासाठी चैत्यन्य खिलारी यांनी ‘सैराट चित्रपटातील कलावंताना पहिल्यांदाच नवी मुंबईत पाचारण केले आहे. ‘सैराट’ फेम कलावंत, परश्या म्हणजेच आकाश ठोसर आणि त्याच्यासह इतर कलावंत सदर ठिकाणी अवतरणार आहेत. याशिवाय शिवसेना नेते तथा परिवहन मंत्री दिवाकर रावते, पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती चैतन्य खिलारी यांनी दिली.
उद्घाटनाच्या दिवशी ग्राहकांना सर्व ब्रॅन्ड्सच्या चष्म्यावर आणि गॉगल्सवर २५ टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत मोफत डोळे तपासणी देखील करण्यात येणार असल्याचे खिलारी यांनी सांगितले.