श्रीकांत पिंगळे
नवी मुंबई :स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्राप्त झालेल्या सुचनांनुसार १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०१६ या पंधरवडा कालावधीत नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्षाच्या उप आयुक्त रिता मेत्रेवार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त तुषार पवार, परिमंडळ-१ चे उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार व सहा. आयुक्त संध्या अंबादे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहेत.
त्याअनुषंगाने७ ऑक्टोबर २०१६ रोजी नेरुळ विभागातील सेक्टर-३ येथे उपस्थित स्थानिक रहिवाश्यांना ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण करणे, प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर न करणे, उघड्यावर शौचास न जाणे याबाबत मार्गदर्शन व प्रबोधन करण्यात आले. स्वच्छतेची शपथ देण्यात आली. तसेच बोनसरी गावातील मुख्य नाल्याची व परिसरात विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या विशेष स्वच्छता मोहिमेमध्ये नगरसेविका शिल्पा कांबळी, नेरुळ विभागातील सहा. आयुक्त संध्या अंबादे, उप स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनवणे, स्वच्छता निरीक्षक यश पाटील, अरूण पाटील, जयेश पाटील, उप स्वच्छता निरीक्षक योगेश पाटील, स्वच्छाग्रही व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.