श्रीकांत पिंगळे
नवी मुंबईत १५ ठिकाणी आधार कार्ड केंद्र सुरू
० ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना मिळणार लाभ
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ० ते १८ वयोगटात असलेल्या विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोंदणी व्हावी यादृष्टीने महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनानुसार विशेषत्वाने सर्व व्यवस्थापन व माध्यमांच्या शाळा तसेच अंगणवाडी / बालवाडी मधील विद्यार्थ्यांकरीता तसेच नागरिकांकरीता महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत १५ ठिकाणी आधार कार्ड नोंदणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. सर्व आधार कार्ड नोंदणी केंद्रांकरीता समन्वय अधिकार्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
बेलापूर मध्ये श्रीम. रेखा पाटील (संपर्कध्वनी – ९८७००३५९००) यांच्या समन्वयाखाली गुरूवर्य बाळाराम पाटील विद्यालय, दारावे व नमुंमपा शाळा क्र. १, बेलापूर या दोन ठिकाणी तसेच विनोद घोरपडे (संपर्कध्वनी – ९९६७८३५५३०) यांच्या समन्वयाखाली नमुंमपा शाळा क्र. २२/२३, तुर्भे स्टोअर व नमुंमपा शाळा क्र, २५/२६, इंदिरानगर या दोन ठिकाणी आधार कार्ड नोंदणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत.
वाशीमध्ये विलास भिसे (संपर्कध्वनी – ९०२२७६७७१७) यांच्या समन्वयाखाली सेंट मेरी स्कुल, वाशी व नवी मुंबई कोपरी विद्यालय, से.२६, वाशी आणि मॉडर्न स्कुल वाशी या तीन ठिकाणी तसेच भिकाजी सावंत (संपर्कध्वनी – ९८९२५३४१२१) यांच्या समन्वयाखाली नमुंमपा शाळा क्र. ३१/३२, कोपरखैरणे व रा.फ.नाईक विद्यालय, कोपरखैरणे आणि नमुंमपा शाळा क्र.३५ कोपरखैरणे या तीन ठिकाणी आधार कार्ड नोंदणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत.
त्याचप्रमाणे श्रीम. जयमाला पाटील (संपर्कध्वनी – ९९६७२८११०३) यांच्या समन्वयाखाली नमुंमपा शाळा क्र. ३६/३७ कोपरखैरणेगाव व नमुंमपा शाळा क्र. ४१ अडवली भूतवली या दोन ठिकाणी तसेच खुशाल चौधरी (संपर्कध्वनी – ९८६७९२२४१५) यांच्या समन्वयाखाली नमुंमपा शाळा क्र. ७५/७६ घणसोली या ठिकाणी आधार कार्ड नोंदणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
दिघा येथे सुप्रिया पायरे (संपर्कध्वनी – ९८१९१७६२२६ ) यांच्या समन्वयाखाली नमुंमपा शाळा क्र. ५१/५२ दिघा येथे तसेच आनंदा गोसावी (संपर्कध्वनी – ९१६७२६३०३५) यांच्या समन्वयाखाली नमुंमपा शाळा क्र. ५४/५५ कातकरीपाडा येथे आधार कार्ड नोंदणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी या केंद्रांवर आपल्या शाळांमधील आधार कार्ड न काढलेल्या विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोंदणी करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही त्वरीत करावी व आधार कार्ड न काढलेल्या नागरिकांनीही याचा लाभ घ्यावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.