खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नांना यश
श्रीकांत पिंगळे
नवी मुंबई : ठाणे -बेलापूर मार्गाला जोडणारा एरोली ते डोंबिवली येथील काटई नाकापर्यंतच्या रस्त्याला मंजुरी मिळाली असून या रस्त्याचे काम एम एम आर.डी मार्फत होत असून त्यापैकी पहिल्या टप्यातील कामाला मंजुरी मिळाली असून या रोडची पाहणी करण्याकरिता खासदार राजन विचारे ,आमदार सुभाष भोईर, विरोधी पक्ष नेता विजय चौगुले तसेच एम.एम.आर.डी.एचे कार्यकारी अभियंता जगताप, उप कार्यकारी अभियंता जगताप, एम.एस.टी.सी.एलचे परेश पाटील, एम.आय.डी.सीचे कांबळे व इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते.
हा ठाणे -बेलापूर मार्गावरील एरोली ते डोंबिवली येथील काटई नाका १२.३ किलोमीटरचा पर्यतचा रस्ता असून अदांजे १००० कोटीची आवश्यकता असून हा रस्ता तीन टप्यात घेतला असून पहिला टप्यात ठाणे बेलापूर ते एन,एच ४ ( भारत गेयर्स कंपनी ) पर्यंत साडे तीन किलोमीटरचा पट्टा असून हा रस्ता ३-३ लेन चा आहे याला ३८५ कोटीच्या कामाला मंजुरी मिळाली असून त्यापैकी एरोली ते भारत गेअर्स ह्या १.७ किलोमीटरचा भुयारी मार्गाच्या रस्ताच्या कामाची २५१ कोटीची निविदा पर्क्रिया पूर्ण झालेली असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे त्याचा फायदा बदलापूर ,डोंबिवली येथील नागरिकांना होणार आहे त्यामुळे हे अंतर २० मिनिटात गाठू शकते.