श्रीकांत पिंगळे
नवी मुंबई : महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कायम कामगारांना 16 हजार रूपये तर कंत्राटी कामगारांना 8 हजार 500 रूपये सानुग्रह अनुदान स्थायी समितीमध्ये जाहिर झाले आहे. याबाबत सर्वप्रथम नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष व कामगार नेते रवींद्र सावंत यांनी उघडपणे जाहिररिरत्या नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता कायम आस्थापनेवरील कर्मचारी व अधिकार्यांना 25 हजार रूपये, कंत्राटी व ठोक मानधनावरील कर्मचार्यांना 15 हजार रूपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी रवींद्र सावंत यांनी केली आहे.
गेल्या काही महिन्यापासून इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाकडे कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी व त्यांना सुविधा मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरू केला असून मंत्रालयीन पातळीवरही सावंत चपला झिजवित आहेत.
महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता महापालिकेने सानुग्रह अनुदानाबाबत कामगारांच्या हिताचा विचार करणे आवश्यक असून महासभेदरम्यान नगरसेवक व प्रशासनाने कामगारांना समाधानकारक सानुग्रह अनुदान मिळेल यावर प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.
रोजदांरीवर काम करणार्या कामगारांनाही दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ठराविक स्वरूपात बोनस देणे गरजेचे असल्याचे सावंत यांनी यावेळी सांगितले.
दिवाळी आता तोंडावर आली असल्यामुळे प्रशासव व लोकप्रतिनिधींनी आपल्यातील वाद प्रतिष्ठेचा न करता कामगारांच्या सानुग्रह अनुदानाचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा अशी मागणी रवींद्र सावंत यांनी केली आहे.