२४ तास जनसेवेसाठी उपलब्ध अशी जाहिरातबाजी प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्यांकडून तसेच नेतेमंडळींकडून करण्यात येत असते. परंतु हे केवळ कागदोपत्रीच असते. प्रत्यक्षात २४ तास सोडा, पण साधे ४ ते ५ तास जनसेवा करतानाही ही मंडळी आढळत नाही. परंतु यालाही काही मंडळी अपवाद असतात. या माणसांना कधीही रात्री-अपरात्री फोन करा. ही माणसे जनकल्याणाकरता धावपळ करण्याकरता सज्ज असतात. याच पठडीत मोडणारा एक शिवसैनिक म्हणजेच दिलीप किसनराव आमले यांचे नाव आर्वजून घ्यावे लागेल.
नेरूळ नोडमध्येच नाही तर नवी मुंबईतल्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात सर्वपरिचित असे नाव म्हणजेच दिलीप किसनरा आमले हे होय. रूग्णवाहिका असो व रूग्णालयीन मदत, शालेय ऍडमिशन असो वा कोणाला रक्ताची मदत, गरज कोणतीही असो, समस्या कोणतीही असो. ९८२१६९२७५६ हा क्रमांक कोणीही डायल करा. दिलीप किसनराव आमले तात्काळ हजर. ही अतिशयोक्ती नाही तर त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा हा प्रत्यक्ष अनुभव आहे.
गेली २३ वर्षे दिलीप आमले सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. सिडकोचे माजी संचालक व नगरसेवक तसेच शिवसेनेचे गोवा राज्य सहसंपर्क असलेले नामदेव भगत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नेतृत्वाखाली दिलीप आमले यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील आपला श्रीगणेशा केला. आजही नामदेव भगत यांचे कडवट अनुयायी अशीच दिलीप आमले यांची नवी मुंबईत प्रतिमा आहे.
सुरूवातीला कॉंग्रेस पक्षामध्ये अडीच दशके दिलीप आमले यांनी राजकीय कार्य केले. तत्कालीन प्रभाग ६९चे वॉर्ड अध्यक्ष तसेच कॉंग्रेसच्या एका सेलचे त्यांनी तालुकाध्यक्षपदही भूषविले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणूकीच्या अगोदर म्हणजेच २३ फेब्रुवारी २०१५ रोजी नामदेव भगत यांच्यासमवेत दिलीप आमले यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आजमितीला ते प्रभाग ८६ चे शिवसेना शाखाप्रमुख तसेच महाराष्ट्र शिववाहतुक सेनेचे नवी मुंबई अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय नवी मुंबई रिक्षा चालक मालक सेवाभावी संस्थेचे आमले संस्थापक अध्यक्ष आहेत. विना हेलमेट फिरणार्या दुचाकी चालकांना दर महिन्याला आमले स्वत: वाहतुक पोलिसांसमक्ष एक हेलमेट भेट देत असतात. नुकतीच त्यांनी नेरूळ परिसरात व्हॉट्स अप गणेशोत्सव स्पर्धा आयोजित केली होती. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षेकरता त्यांनी मोफत रिक्षा प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. दहावी-बारावीचे निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन सुविधाही उपलब्ध करून दिली होती. त्यांच्या माध्यमातून २४ तास रूग्णालयीन सेवाही चालविण्यात येत आहे.
दिलीप आमले हे त्रिमूर्ती मित्र मंडळ, त्रिमूर्ती महिला मंडळ, त्रिमूर्ती वाचनालय संस्था, मुक्ताई शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. नेरूळ सेक्टर सहा परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये ते गेली ३ वर्षे सचिव म्हणून कार्यरत आहेत. लोकमान्य टिळक जनकल्याणकारी संस्थेमध्ये सहसचिव म्हणून कार्यरत आहेत.
अंकिता मोटर ट्रेनिंग स्कूलच्या माध्यमातून दिलीप आमले यांनी नवी मुंबईतील १०९ महिलांना ‘ना नफा, ना तोटा’ या तत्वावर रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण देवून त्यांना परवानाही दिला आहे. त्यांचे सेवाभावी कार्य पाहून शिवसेना संघटनेने त्यांचा गौरव करताना त्यांना एक रिक्षाही भेट दिलेली आहे.
दिलीप आमले यांना त्यांच्या वाटचालीस नवी मुंबई लाईव्ह परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा..