संजय बोरकर : 9869966614
नवी मुंबई : सिडकोचे माजी संचालक, नवी मुंबई महानगरपालिकेतील शिवसेना नगरसेवक तसेच शिवसेनेचे गोवा राज्य सहसंपर्कप्रमुख नामदेव भगत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे स्वागत केले.
गोवा राज्य सहसंपर्कपदी काही दिवसांपूर्वीच नामदेव भगत यांची शिवसेनेने नियुक्ती केली आहे. गोवा विधानसभेच्या निवडणूका आता जवळ आल्या असून या पार्श्वभूमीवर नामदेव भगत यांची झालेली सहसंपर्कपदी निवड म्हणजे शिवसेनेने त्यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास दाखवित मोठी जबाबदारी सोपविली आहे. पक्षाने दिलेल्या जबाबदारीला न्याय देताना नामदेव भगत गेली दोन गोवा परिसर पिंजून काढताना संघटनात्मक ताकद व राजकीय परिस्थितीचा अंदाज घेत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे गोव्यात आल्यावर सहसंपर्क असलेल्या नामदेव भगत यांनी स्वागत केले. गोवा सहसंपर्कपदी झालेली नियुक्ती ही नामदेव भगत यांना मातोश्रीशी जवळीक साधण्याची अनायसे चालून आलेली संधी असल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.