संजय बोरकर : 9869966614
नवी मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नेरूळ सेक्टर 8 परिसरातील एल मार्केट येथे आणि नेरूळ सेक्टर 2 येथील राजीव गांधी उड्डाणपुलाखाली साई जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने स्वस्त दरात खाद्य तेल व साखरेची विक्री करण्यात आली.
80% समाजकारण आणि 20% राजकारण या हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीने प्रेरित व जनसेवा हिच ईश्वर सेवा मानून गेली 6 वर्ष साई जनसेवा प्रतिष्ठान संस्थपाक अध्यक्ष रतन मांडवे, विश्वस्त नगरसेविका सौ. सुनीता रतन मांडवे व आयोजक शिवसेना उपविभाग प्रमुख मनोज चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार तेल वाटप हा उपक्रम राबवून जनसेवा करीत आहे व या उपक्रमास जनतेनेही नेहमीच उत्सुकतेने साथ दिली त्याचाच भाग म्हणजे रविवारी 2000 लिटर तेल व 700 किलो साखर ह्याची विक्री अवघ्या तासाभरात झाली.
या कार्यक्रमास शिवसेना माजी नगरसेवक व साई जनसेवाचे संस्थापक अध्यक्ष रतन मांडवे, स्थानिक नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे, शिवसेना उपविभागप्रमुख मनोज चव्हाण, युवा सेनेचे बेलापुर उप विधानसभा अधिकारी निखिल मांडवे उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश शिवतरकार, विकास म्हात्रे, सचिन धुमाळ, अमोल कोंडे, अमोल धोंडे, रोहित कोदेरे, आशिष गोंडुले, भास्कर बागल, शरद पांजरी, राजू निगडे, संतोष नवघणे, प्रकाश वाघमारे, प्रकाश कारभार, मंगेश शिवतरकार, मोडवे, गणेश सावंत, इंद्रजित जाधव, शंकर पडवळ, राजू प्रभू, शंकर परब, सुरेश मोरे, अनुभव बेळे, अमित कुदळे, गौतम शिरवाळे यांनी परिश्रम घेतले.