शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवेचे तिसर्यांदा निवेदन
नवी मुंबई : नेरूळ पश्चिमेकडील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व नागरिकांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नेरूळ पश्चिमेला वॉक विथ कमिशनर हे अभियान लवकरात लवकर राबविण्याची मागणी शिवसेनेच्या प्रभाग ८७च्या नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर ८ परिसरातील राजर्षी शाहू महाराज उद्यानात मनपा आयुक्तांनी वॉक विथ कमिशनर हे अभियान राबवावे यासाठी नगरसेविका मांडवे यांनी यापूर्वीही महापालिका आयुक्तांना दोन वेळा लेखी निवेदन सादर केलेले आहे. नेरूळ पश्चिमेकडील लोकसंख्या लाखाच्या घरात असून नागरिकांना मुंढे यांच्याशी सुसंवाद साधण्याची इच्छा असून अनेक नागरिकांनी त्याबाबत आपणाकडे मागणीही केली असल्याचे नगरसेविका मांडवे यांनी सांगितले. आयुक्तांनी वॉक विथ कमिशनर जाहिर केल्यावर संबंधित परिसरातील किरकोळ समस्या महापालिका प्रशासन अभियान सुरू होण्यापूर्वीच सोडवित असल्याचा नवी मुंबईकरांचा अनुभव आहे. नेरूळ पश्चिमेला अभियान राबविल्यास सारसोळे, कुकशेत, नेरूळ या गावांतील ग्रामस्थांना तसेच नेरूळ सेक्टर २ ते सेक्टर २८ मधील रहीवाशांना आपले म्हणणे थेट आयुक्तांपुढे सादर करण्याची संधी उपलब्ध होईल. अभियानामागची गरज व मागणीमागील प्रामाणिक तळमख पाहता आयुक्तांनी नेरूळ सेक्टर ८ मधील राजर्षी शाहू महाराज उद्यानात वाीक विथ कमिशनर हे अभियान राबवावे, अशी मागणी नगरसेविका मांडवे यांनी निवेदनातून केली आहे.