नवी मुंबई : ऐरोलीच्या धर्तीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ऐरोलीचे युवा आमदार संदीप नाईक यांच्या संकल्पनेतून कोपरखैरणे सेक्टर 11 – 12 होल्डिंग पाँडच्याबाजूला, कलश उद्यान बस स्टॉपजवळ आमदार विकास निधीतून साकारणार्या पहिल्या जॉगिंग ट्रक ( पदपथ )च्या कामाचा शुभारंभ मोठ्या दिमाखात संपन्न झाला. याप्रसंगी आमदार संदीप नाईक यांच्या समवेत, नगरसेवक मुनावर पटेल, नगरसेवक लीलाधर नाईक, देवीदास हांडेपाटील नगरसेविका लता मढवी , नगरसेविका वैशाली नाईक, राष्ट्रवादीचे पदाधिकारी समाजसेवक संदीप म्हात्रेे, राबिन मढवी , महिला कार्यकर्ता , पदाधिकारी , प्रभागातील नागरिक आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाग क्रमांक – 52 कोपरखैरणे येथील कलश उद्यान बस थांबा ट्री बेल्ट लगत ते ऑक्सिस बैंकपर्यंत हा जॉगिंग ट्रक तयार केला जाणार आहे . यासाठी संदीप नाईक यांनी 30 लाखांचा आमदार निधी जाहीर केला आहे . काम सुरु होताच सदरचा जॉगिंग ट्रक हा 3 ते 4 महिन्यात नागरिकांसाठी खुला होणार आहे . या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक मॉर्निंगवाकसाठी येत असतात . सदर प्रभागात जेव्हा आमदार संदीप नाईक यांनी आमदार आपल्या दारी या अभियानांतर्गत नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याशी सवांद साधला होता तेव्हा नागरिकांनी आमदार संदीप नाईक यांच्याकड़े जॉगिंग ट्रकची मागणी केली होती . नागरिकांच्या या मागणीला ग्राह्य मानत ऐरोलीत साकारलेल्या इको जॉगिग ट्रकच्या धर्तीवर कोपरखैरणे येथे जॉगिग ट्रक साकारणार असल्याची आपली संकल्पना संदीप नाईक यांनी नागरिकांशी सवांद साधताना बोलून दाखवली होती. आज खर्याअर्थाने आपल्या या संकल्पनेला वास्तविकतेमध्ये उतरवून आमदार संदीप नाईक यांनी मतदारांना दिलेला शब्द पूर्ण करून दाखवला आहे . यावेळी उपस्थितीत नागरिकांनी समाधान व्यक्त केले .