परिवहनच्या 59 वाहक व 66 चालकांची सेवा समाप्ती
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाला लागलेली उतरती कळा रोखण्यासाठी महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी यापूर्वी परिवहन उपक्रमात सुधारणा करण्यासाठी वारंवार बैठका घेऊन आढावा घेतला होता व त्याअनुषंगाने सर्व प्रथम सतत गैरहजर राहणार्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. मागील सहा महिन्यात वारंवार गैरहजर राहणारे ठोक मानधनावरील 59 वाहक व 66 चालक यांच्या सेवा समाप्ती करण्याबाबत गुरूवारी आदेश काढण्यात आले आहेत.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंवर सभागृहातील नगरसेवक कामकाजादरम्यान गरळ ओकत असतानाच मुंढेच्या कार्यप्रणालीवर या राजकीय वादळाचा तसूभरही परिणाम झालेला नाही. त्यांनी परिवहनचे उत्पन्न वाढविणे व परिवहनच्या कर्मचारी-अधिकार्यांना शिस्त लावणे हा आपला एककलमी कार्यक्रम तसाच कायम ठेवला आहे. काम न करणार्या ठेकेदारांवर कारवाई करण्याच्या सुचना दिलेल्या होत्या. त्याअनुषंगाने सतत गैरहजर राहणार्या कायम 24 कर्मचार्यांना बडतर्फ करण्यात आले होते. ठोकमानधन व रोजंदारीवर काम करणारे 214 चालक / वाहक यांना कायम स्वरुपी कामावरुन काढून टाकण्यात आले होते, व पर्यवैक्षकीय 15 अधिकारी कर्मचारी यांच्या विभागीय चौकश्या सुरु केलेल्या आहेत. जेएनएनआरयूएम अंतर्गत आयटीसचे कामकाज करणारे ठेकेदार मेसर्स. ट्रमेक्स लिमिटेड यांचे काम बरोबर नसल्याने यांचा 4.5 कोटीचा कामाचा ठेका रद्द करण्यात आला होता. तद्नंतर आयुक्तांनी 8 सप्टेंबर 2016 रोजी परिवहन उपक्रमास भेट देऊन परिवहन उपक्रमाच्या सर्व विभागांचा आढावा घेऊन अकार्यक्षम व गैरहजर राहणारे अधिकारी कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने तसेच वाहतूक नियंत्रक दर्जाचा एका अधिकार्याला पदावनत एका वाहक बडतर्फ करण्यात आलेला आहे. व त्याचप्रमाणे 15 अधिकारी यांची चौकशी चालू असून त्यांची लवकरात लवकर विभाग चौकशी पूर्ण करुन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश परिवहन व्यवस्थापकांना दिलेले आहेत.
आयुक्तांनी परिवहन उपक्रमाचा आढावा घेतावेळेस त्यांच्या निदर्शनास आलेल्या बाबीमध्ये बसेस वेळेवर नसणे, गरज नसतांना बसेसच्या फेर्या रद्द करणे, बसेसचे ब्रेक डाऊनस व कामचुकार व गैरहजर अधिकारी यामध्ये सहाय्यक वाहतूक अधिक्षक, वाहतूक निरीक्षक, सहा. वाहतूक निरीक्षक, लिपीक व अभियंते यांच्यावरसुध्दा कारवाई करणेबाबत परिवहन व्यवस्थापकांना सुचित केले आहे. ायटीस प्रणालीमधून प्रवाशांना मोबाईल अॅपद्वारे बसेसचे लाइव्ह वेळापत्रक लवकरात लवकर देण्याचे सुचित केले आहे.