मनसे शहर सचिव संदीप गलुगडेंच्या मागणीला मुंढेंचा सकारात्मक प्रतिसाद
नवी मुंबई / अनंतकुमार गवई
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नागरिकांशी थेट सुसंवादात्मक वॉक विथ कमिशनर उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत असून या शनिवारी 17 डिसेंबर 2016 रोजी एन.एम.एम.टी. बसडेपो, पामबीच मार्गाजवळ, सेक्टर 15, घणसोली याठिकाणी महापालिका आयुक्त सकाळी 6.30 वा. अधिका-यांसह उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
यावेळी जे नागरिक आपल्या तक्रारी / सूचना / संकल्पना महापालिका आयुक्त आयुक्त यांच्याकडे सादर करु इच्छितात त्यांनी त्या लेखी स्वरूपात सोबत घेऊन याव्यात व त्याठिकाणी सकाळी 6.00 वा. पासून उपस्थित असणार्या महापालिका विभाग कार्यालय प्रतिनिधीकडून आपला टोकन क्रमांक प्राप्त करून घ्यावा आणि टोकन क्रमांकानुसार महापालिका आयुक्त यांची भेट घेऊन आपले निवेदन सादर करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
काही दिवसापूर्वीच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घणसोली रेल्वे स्थानकानजीकच वॉक विथ कमिसनर हे अभियान राबविले होते. घणसोली नोड नुकताच सिडकोकडून नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरीत झालेला आहे. मनसे शहर सचिव संदीप गलुगडे यांनी आयुक्तांनी घणसोली नोडमध्ये वॉक विथ कमिशनर अभियान राबवावे यासाठी पालिका प्रशासनाकडे लेखी पाठपुरावा केला होता.