ठाणे – जयश्री पाटील :- ८८७९४८४८३६
***
बसखाली सापडल्याने ३४ वर्षीय अज्ञाताचा मृत्यू !
ठाणे : रेल्वे स्टेशन कडून अशोक टोकीज कडे जाताना रस्त्यावरून चालणारा ३४ वर्षीय अज्ञात इसम अचानक रत्यावर कोसळल्याने मागून येणार्या बसच्या खाली सापडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी फिर्यादी किरण रामचंद्र पवार(२१) रा. जांभळी नाका यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात बसचालक दयाराम राजाराम सुतार(५५) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी बसचालक याला अटक केली. शनिवारी १०-१५ वाजण्याच्या सुमारास स्टेशन रोडवर अज्ञात इसम जात असताना अचानक रस्तावरच कोसळला. त्याचवेळी रस्त्यावरून येणार्या एमएच २० डी ९९९० बस खाली सापडला आणि त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ठाणे नगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
********************
जैन मंदिराच्या दानपेटीवर अज्ञात चोरट्याचा दरोडा !
ठाणे : शहरात चोरट्यांचा वावर वाढला आहे. गास्तीवरच्या पोलिसांना गुंगारा देत चोरते हात कि सफाई करीत पोबारा करीत आहेत. बंद घरे,दुकाने यानंतर आता चोरट्यांनी मंदिराच्या दानपेट्या लक्ष्य केल्या आहेत. यापूर्वी ही अनेक दानपेट्या चोरट्यांनी खाली केल्या आहेत. १५ डिसेंबर ते १६ डिसेंबर दरम्यान खारकर आळीतल्या जैन धर्मियांच्या मंदिराची दानपेटी चोरट्याने साफ केली असल्याची घटना घडली. याप्रकरणी फिर्यादी संजय सरेमल रांका(४५) रा. आत्मबंधू आर्केड खारकर आळी यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. अज्ञात चोरट्याचा शोध पोलीस घेत आहेत.
*******************
बाईकस्वराला मिनी बसची धडक-बाईकस्वर जखमी !
ठाणे : घोडबंदर रोडवरून ठाण्याकडे येणार्या बाईकला मिनीबसने मागून दिलेल्या धडकेत बाईकस्वर वैदयही गोविंद अन्सारी(२७) रा. विजयनगरी वाघबीळ घोडबंदर रोड, ठाणे हे जखमी झाले त्यांच्या दोन हाताना इजा झाली. या प्रकरणी अज्ञात बसचालकाच्या चालकाविरोधात कापुरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादी वैदयही गोविंद अन्सारी हे शनिवारी दुपारी १-१५ वाजण्याच्या सुमारास बाईकवरून घोडबंदर रोडवरून ठाण्याकडे येत होते. मानपाडा दरम्यान मागून येणार्या अज्ञात खाजगी बस क्रमांक एमएच ०४ जेके ३७५१ हिने मागून धक्का दिला. अन घडलेल्या अपघातात अन्सारी यांच्या दोन्ही हाताला इजा झाली. अपघातानंतर बसचालक याने पोबारा केला. कापुरबावडी पोलीस अज्ञात बसचालकाचा शोध घेत आहेत.
****((**
मद्यविक्रीचा परवाना देण्याच्या बहाण्याने २३.१७ लाखाचा गंडा !
ठाणे : मद्य विक्रीच्या परवाना देण्याचा झासा देत फिर्यादी महेश गेंदालाल बडगुजर यांना आरोपीने तब्बल २३.१७ लाखाचा गंडा आरोपी आशुतोश श्रीवास्तव यांनी घातला. याप्रकरणी कापुरबावडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी आशुतोश मनोजकुमार श्रीवास्तव रा. होरीझोन अपार्टमेंट अंधेरी वर्सोवा याने फिर्यादी यांना मद्य विक्रीचा परवाना देतो अशी बतावणी करीत ५ नोव्हेंबर,२०१५ ते १४ फेब्रुवारी,२०१६ या कालावधीत रुणवाल गार्डन बाळकुम येथून रक्कम घेतली. कालवधी उलटल्यानंतर विचारणा केली असता टोलवाटोलवी करण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे बडगुजर यांच्या लक्षात येताच कापुरबावडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. कापुरबावडी पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.