जयश्री पाटील :- ८८७९४८४८३६
नवी मुंबई: घणसोली नोड हस्तांतरण प्रकरणी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सभागृहाला विश्वासात न घेता स्वतः च्या स्तरावर निर्णय घेवून सभागृहाची दिशाभूल केली आहे. प्रशासनाने अभ्यास न करता घणसोली नोड महापालिकेकडे हस्तांतरीत केल्याने महापालिकेसह नागरिकांच्या अडचणीत वाढ झाल्याचा आरोप करीत प्रशासनाच्या निषेधार्थ सदस्यांनी केलेल्या मागणीनुसार महासभा तहकूब करण्याचा निर्णय महापौर सुधाकर सोनवणे यांनी घेतला.
१९ डिसेंबर रोजी झालेल्या महासभेमध्ये विषय पत्रिकेवरील विषय सुरू होण्यापूर्वी शिवसेनेचे नगरसेवक द्वारकानाथ भोईर यांनी घणसोली नोड हस्तांतरण झाल्याची चांगली बाब असली तरी या नोडमध्ये कामे अपूर्ण आहेत. घणसोली नोडमध्ये असलेल्या ३० सेक्टर्सपैकी २२ सेक्टर्स अविकसित आहेत. ती विकसित करण्यासाठी ‘सिडको’ने केवळ ७८ कोटी रुपये देणे कितपत योग्य आहे. येथील दोन सेक्टर्सची जागा विकून सिडकोने पंधराशे कोटी घेतले. मग सदर प्रकारात विरोधाभास असून ‘सिडको’ने सामाजिक सेवेचे येथील भूखंड पूर्णपणे हस्तांतरण केले नाही. घणसोली, गोठिवली, तळवली जवळची गावांची जागा सिडकोच्या मालकीची आहे. सदर गावांचे अद्याप सिमांकन झालेले नाही. गरजेपोटीच्या घरांचा प्रश्न असून सदर बाबी अधांतरी ठेवून प्रशासन नोड हस्तांतरणाचा गवगवा करीत असल्याचा आरोप करीत द्वारकानाथ भोईर यांनी सभा तहकुबीची यावेळी महापौरांकडे मागणी केली.
त्यावर सभागृह नेते जयवंत सुतार यांनी घणसोली ोड हस्तांतरीत करुन महापालिकेने नागरिकांना गाजर दाखवले असल्याचे सांगितले. महापालिकेत हिटलरशाही पद्धतीने काम सुरू आहे. यापूर्वी अनेक प्रकल्प ‘सिडको’कडून हस्तांतरित केले तेव्हा प्रशासनाने विश्वासात घेतले. मग आता का नाही अशी विचारणा केली असे सांगत सुतार यांनी द्वारकानाथ भोईर यांनी सभा तहकूब करण्याच्या मागणीला अनुमोदन दिले.
दुसरीकडे शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत पाटील यांनी घणसोली हस्तांतरित होत असताना गेली १५ वर्षे होत असतांना कोण आमदार, खासदार, पालकमंत्री होते ते सर्वांना माहित आहे. सावली गाव अतिक्रमित झोपडपट्टी दाखवून तो महापलिका आणि सिडकोने नेस्तनाबूत केल्याची बाब सर्वज्ञात असल्याचे प्रशांत पाटील यांनी सांगितले.
घणसोलीत स्टेडिअमचा भूखंड विनामुल्य हस्तांतरीत होणे अपेक्षित असतांना तो कोट्यवधी रुपये देऊन घेण्यात आला. ‘सिडको’ने वापारात बदल करून भूखंड विकले असल्यामुळेत्या भूखंडांना सीसी महापालिकेने देऊ नये. महापालिकेसाठी राखीव भूखंड विकले आहेत. यात काही अधिकारी दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत. सिडको आता जे भूखंड देत आहे ते कमीत कमी किंमतीत घेऊन पदरात पाडून घ्या, अशी सूचना मनोहर मढवी यांनी केली.द्वारकानाथ भोईर यांनी सभा तहकुबीची यावेळी महापौरांकडे मागणी केली. त्यावर सभागृह नेते जयवंत सुतार यांनी घणसोली नोड हस्तांतरीत करुनमहापालिकेने नागरिकांना
गाजर दाखवले असल्याचे सांगितले. महापालिकेत हिटलरशाही पद्धतीने काम सुरू आहे. यापूर्वी अनेक प्रकल्प ‘सिडको’कडून हस्तांतरित केले तेव्हा प्रशासनाने विश्वासात घेतले. मग आता का नाही अशी विचारणा केली असे सांगत सुतार यांनी द्वारकानाथ भोईर यांनी सभा तहकूब करण्याच्या मागणीला अनुमोदन दिले.
दुसरीकडे शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत पाटील यांनी घणसोली हस्तांतरित होत असताना गेली १५ वर्षे होत असतांना कोण आमदार, खासदार, पालकमंत्री होते ते सर्वांना माहित आहे. सावली गाव अतिक्रमित झोपडपट्टी दाखवून तो महापलिका आणि सिडकोने नेस्तनाबूत केल्याची बाब सर्वज्ञात असल्याचे प्रशांत पाटील यांनी सांगितले.
घणसोलीत स्टेडिअमचा भूखंड विनामुल्य हस्तांतरीत होणे अपेक्षित असतांना तो कोट्यवधी रुपये ेऊन घेण्यात आला. ‘सिडको’ने वापरात बदल करून भूखंड विकले असल्यामुळे त्या भूखंडांना सीसी महापालिकेने देऊ नये. महापालिकेसाठी राखीव भूखंड विकले आहेत. यात काही अधिकारी दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत. सिडको आता जे भूखंड देत आहे ते कमीत कमी किंमतीत घेऊन पदरात पाडून घ्या, अशी सूचना मनोहर मढवी यांनी केली. दरम्यान, सर्वसाधारण सभा बैठकीत घणसोली नोड हस्तांतरण मुद्यावर सदस्यांची मते ऐकून घेतल्यानंतर महापौर सुधाकर सोनवणे यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर जोरदारटिकास्त्र सोडले. घणसोली नोड हस्तांतरण प्रक्रिया फक्त घणसोली नोड हस्तांतरण प्रसिध्दीचा एक स्टंट असल्याचा आरोप महापौर सुधाकर सोनवणे यांनी यावेळी केला. महापालिका आयुक्तांनी घणसोलीतील समस्यांचा सारासार विचार न करता फक्त श्रेय घेण्यासाठी नोड हस्तांतरण केला असल्याचे सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शहरात सुरू झालेली आणीबाणी थांबवून या शहराला आणखी खड्ड्यात घालण्यापासून वाचवावे. परिणामी, आयुक्तांच्या सदर कारभाराचा निषेध करीत महापौर सुधाकर सोनवणे यांनी सर्वसाधारण सभा तहकूब केली.
दरम्यान, सर्वसाधारण सभा बैठकीत घणसोली नोड हस्तांतरण मुद्यावर सदस्यांची मते ऐकून घेतल्यानंतर महापौर सुधाकर सोनवणे यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टिकास्त्र सोडले. घणसोली नोड हस्तांतरण प्रक्रिया फक्त घणसोली नोड हस्तांतरण प्रसिध्दीचा एक स्टंट असल्याचा आरोप महापौर सुधाकर सोनवणे यांनी यावेळी केला. महापालिका आयुक्तांनी घणसोलीतील समस्यांचा सारासार विचार न करता फक्त श्रेय घेण्यासाठी नोड हस्तांतरण केला असल्याचे सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शहरात सुरू झालेली आणीबाणी थांबवून या शहराला आणखी खड्ड्यात घालण्यापासून वाचवावे. परिणामी, आयुक्तांच्या सदर कारभाराचा निषेध करीत महापौर सुधाकर सोनवणे यांनी सर्वसाधारण सभा तहकूब केली.