खासदार राजन विचारे यांच्या पाठपुराव्याला यश
गणेश इंगवले / नवी मुंबई
जुई नगर सेक्टर २२ येथील रेल्वे कॉलनीतील इमारतीच्या कामांचे भूमिपूजन सोहळा आज पार पाडण्यात आला. त्याचे उद्घाटनप्रसंगी शिवसेना उपनेते विजय नाहटा , खासदार राजन विचारे ,नवी मुंबई महानगरपालिका विरोधी पक्ष नेता विजय चौगुले, बेलापूर सम्पर्क प्रमुख विठ्ठल मोरे,उपजिल्हाप्रमुख मनोहर गायके ,नवी मुंबई महिला जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, शहर प्रमुख विजय माने, गटनेता द्वारकानाथ भोईर, शिवसेनेचे माजी महापालिका पक्षप्रतोद रतन नामदेव मांडवे तसेच स्थानिक नगरसेविका रुपाली निशांत भगत व शिवसेना नगरसेवक सोमनाथ वासकर, रंगनाथ आवटी, नामदेव भगत, काशीनाथ पवार ,विशाल ससाणे ,परिवहन सदस्य लोके उपविभागप्रमुख राजेश पोसम ,मनीष जाधव ,शाखाप्रमुख स्वानंद शिंदे,अजय सावंत,राजेश्री पेठामकर बेलापूर विधानसभा युवा अधिकारी मयुर ब्रीद, युवासेना उपविधानसभा अधिकारी निखिल रतन मांडवे तसेच युवा सैनिक व शिवसैनिक ,रेल्वे वसाहतीतील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते यावेळी उपस्थित असलेले मध्य रेल्वेचे सिनियर सेक्शन इंजिनियर दुबे यांचे खासदार राजन विचारे यांनी सत्कार करून या कामासाठी लागणारे मटेरियल उत्तम दर्जाचे वापरा अश्या सूचना त्यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या .
जुई नगर सेक्टर २२ येथील रेल्वे कॉलनीतील इमारतीचे काम सन १९९८ मध्ये पूर्ण झाल्या नंतर या इमारतीन मध्ये रेल्वे कर्मचार्याच्या ६०० कुटुंबाना राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती . परंतु या इमारतींचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे पावसाळ्यात लिकेज होऊन स्ल्याँब कोसळण्याच्या दुर्घटना घडत होत्या त्यामुळे तेथील रेल्वे कामगार व त्याच्या परिवाराला आपला जीव मुठीत घेऊन राहावे लागत होते .स्थानिक नगरसेविका यांनी हि बाब खासदार राजन विचारे यांच्या निर्दशनास आणून दिल्यांनतर त्यांनी लगेचच रेल्वे प्रशासनासोबत एका बैठीकीचे आयोजन करण्यात आले त्या मध्ये सिडको व नवी मुंबई महापालिकेच्या सर्व अधिकार्यांना बोलाविण्यात आले त्या बैठीकीत रेल्वे कॉलनीतील सांडपाणीचा निचारा न झाल्याने २० फुट खोल टाकीत महिला पडल्याने बुडता बुडता वाचलेल्या महिलेसारखी पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी रेल्वे प्रशासनाला नवीन ड्रेनेज लाईन टाकण्यात यावी व महापालिकेच्या मुख्य ड्रेनेज लाईन ला जोडण्यात यावी असे सांगण्यात आले त्याचबरोबर कॉलनीतील रस्ते तसेच संरक्षण भिंतीचे काम व या इमारतीचे स्ट्रक्चर ओडीट करून घेऊन ज्या पडण्यास योग्य आहे त्या पाडून उरलेल्या इमारतीचे दुरुस्तीचे काम लवकर सुरु करा अश्या सूचना त्यावेळी खासदार राजन विचारे यांनी रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या . त्या कामाची सुरुवात न झाल्याने पुन्हा रेल्वे प्रशासनाकडे पत्र देऊन पाठपुरावा सुरूच ठेवला व त्यांनतर रेल्वे कडून या सर्व कामांना १ करोड ९८ लाखाची तरतूद करून या कामाला आज पासून सुरुवात करण्यात आली हि सर्व कामे १८ महिन्याच्या कालावधीत पूर्ण करणार असे उत्तर रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले .